अखेर सत्य समोर आले! 150 बॉडीगार्ड असल्याचा दावा खरा की फक्त अफवा? तान्या मित्तलने दिले उत्तर

नुकताच बिग बॉस मराठी सिझन 19चा विजेता घोषित करण्यात आला. गौरव खन्नाने बिग बॉस 19चा ताज स्वत:च्या नावे केला. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती घरातील स्पर्धक तान्या मित्तलची. तिच्याकडे 150 बॉडीगार्ड असल्याचे तिने सांगितले होते. आता घराबाहेर आल्यावर तिने यावर प्रतिक्रिया घेतली आहे.

अखेर सत्य समोर आले! 150 बॉडीगार्ड असल्याचा दावा खरा की फक्त अफवा? तान्या मित्तलने दिले उत्तर
Tanya Mittal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 02, 2026 | 4:09 PM

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणून तान्या मित्तल ओळखली जाते. शो दरम्यान तिने आपल्या प्रचंड संपत्ती, कारखान्यांच्या जाळ्याबद्दल आणि राजेशाही जीवनशैलीबद्दल केलेले दावे यामुळे खूप वादंग माजला होता. बिग बॉसच्या घरात सह-स्पर्धकांना तिच्या बोलण्याचा विश्वास बसत नव्हता. तसेच सोशल मीडियावर तर तिच्या खरेपणाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. याच दरम्यान तान्याने स्वतः पुढे येऊन आपल्या व्यवसायाची एक झलक दाखवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्यांनी १५० बॉडीगार्ड ठेवण्याच्या दाव्याचाही खरा अर्थ सांगितला.

तान्या मित्तलने अलीकडेच न्यूज पिंचला आपल्या घराची आणि फार्मा फॅक्टरीचा टूर करून दिला. यावेळी ती 150 बॉडीगार्ड असण्याच्या दाव्याबाबत स्पष्टपणे बोलली. बिग बॉस 19 सुरु असताना तान्याशी संबंधित सर्वाधिक व्हायरल झालेला वाद म्हणजे तिचे १५० बॉडीगार्ड असण्याचा दावा. पण आता फॅक्टरीच्या दौर्‍यात तान्याने या गोष्टीला पूर्णपणे नाकारले आणि स्पष्ट केले की तिने कधीच असा दावा केला नव्हता.

तान्या मित्तलने 150 बॉडीगार्डच्या दाव्याचा सांगितला खरा अर्थ

तान्या मित्तल स्पष्टीकरण देत म्हणाली की, ‘मी हे कधीच म्हटले नाही. इंटरनेटवर तुम्हाला एकही अशी क्लिप सापडणार नाही, ज्यात तान्या मित्तल म्हणत असेल की माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत. या गोष्टी स्वतःहून बनवल्या गेल्या.’ तान्याने सांगितले की हा गैरसमज घरात एका मस्करीमुळे सुरू झाला होता. त्यांनी म्हटले, ‘जीशान याबाबत मस्करी करत होता. खरे तर मी त्यांना म्हटले होते की माझ्याकडे 150 पेक्षा जास्त स्टाफ मेंबर्स (कर्मचारी) आहेत आणि त्यांनी स्टाफला बॉडीगार्ड बनवून टाकले.’

तान्या मित्तलकडे किती बॉडीगार्ड आहेत?

150 बॉडीगार्डची अतिशयोक्तीपूर्ण बातमी फेटाळून लावताना तान्याने हे मात्र मान्य केले की तिच्याकडे सुरक्षेची व्यवस्था असते. तिने म्हटले की मी अनेक वर्षांपासून बॉडीगार्ड ठेवते आहे, मात्र त्यांची संख्या किती हे सांगितले नाही. फॅक्टरीच्या दौर्‍यात तान्याने आपल्या फार्मास्युटिकल युनिटचे वेगवेगळे भाग दाखवले, ज्यात लॅब, टेस्टिंग एरिया आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या मशिन्सचा समावेश होता. तिने तेथील पायाभूत सुविधा आणि वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दलही माहिती दिली. तिने दावा केला की या सर्व मशिन्स मलेशियातून मागवल्या गेल्या आहेत.