Salman Khan: सलमान खान याने उतरवला खासदाराच्या लेकीचा माज, म्हणला, ‘सर्व मर्यादा ओलांडल्या अन्…’
Salman Khan: अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अभिनेत्याने थेट खासदाराच्या लेकीचा माज उतरवला आहे... तिच्यावर निशाणा साधत भाईजान म्हणाला, 'सर्व मर्यादा ओलांडल्या अन्...'

Salman Khan: अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता भाईजान ‘बिग बॉस 20’ या वादग्रस्त शोमुळे चर्चेत आहे. सुरुवातील यंदाच्या बिग बॉसमध्ये काहीच खास नाही… अशी चर्चा रंगलेली. पण आता ‘बिग बॉस 20’ चर्चेत येत आहे. आता तर सलमान खान थेट खासदाराच्या लेकीला सुनावलं आहे. आज होणाऱ्या ‘विक एन्ड का वार’मध्ये सलमान खान स्पर्धकांची चांगलीच क्लास घेताना दिसणार आहे. त्यामुळे यंदाचा ‘विक एन्ड का वार’ मध्ये स्पर्धक हैराण झालेले प्रेक्षकांना दिसणार आहेत. शनिवारी होणाऱ्या ‘विक एन्ड का वार’या प्रोमो देखील सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सलमान स्पर्धक रीती तिवारी हिला सुनावताना दिसणार आहे. रीती ही भाजप खासदार मनोज तिवारी यांची लेक आहे.
‘बिग बॉस 20’ चा प्रोमो जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये सलमान खान म्हणतोय, हा आतापर्यंतचा सर्वाच घाणेरडा Diss होता… काही दिवसांपूर्वी घरात कॅप्टेंसी टाक्स झाला. ज्यामध्ये यंग आणि काझी यांच्या टीमध्ये स्पर्धा होती, दोन्ही टीमच्या स्पर्धकांना एकमेकांना Diss करायचं होतं. म्हणजे एकमेकांचा अपमान करायचा होता. तेव्ही रीतीने सर्व मर्यादा ओलांडल्या… यावेळी तिने अन्य स्पर्धकांनी शिवीगाळ देखील केली. अशात तिच्या टीमने तिला थांबवलं नाही तर, तिचं समर्थन केलं… हे कायम दिसत असलेलं चित्र आहे…’ असं म्हणत सलमान खान याने रीतीचा सर्व माज उतरवला.
🚨 Weekend Ka Vaar Promo: Salman Khan BASHED Rhiti Tiwari badly for her abusive remarks on Uditi and being Insecure of Qazi https://t.co/HxV2NTaHsi
— BBTak (@BiggBoss_Tak) September 25, 2026
एवढंच नाही तर, सलमान खान याने रीती हिला पहिला प्रश्न विचारला की, तिला फक्त काझीचा तिरस्कार नाही तर, त्याच्याबद्दल चांगला विचार देखील करत नाही. यावर रीती म्हणाली, ‘मला त्याचा तिरस्कार नाही. पण मला तो एक व्यक्ती म्हणून बिलकूल आवडत नाही.’ यावर सलमान खान म्हणाला, ‘तू जे केलंस ते योग्य होतं, असं तुला वाटतं का?’
तेव्हा रीती म्हणते, ‘मी जे काही म्हणाले त्याचा हेतू आणि अर्थ चुकीचा बिलकूल नव्हता… ‘, पण सलमान खान याने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि म्हणाला, ‘समोरच्याचा अपमान करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.’, त्यामुळे ‘बिग बॉस 20’च्या घरात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.