Divorce : सगळं काही संपलं? ‘बिग बॉस’ फेम महिला स्पर्धकाच्या ‘त्या’ कृतीने खळबळ; नवऱ्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
Divorce : 6 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर टोकाचा निर्णय! 2 मुलांच्या जन्मानंतर 'बिग बॉस' फेम महिला स्पर्धकाच्या 'त्या' कृतीने खळबळ उडाली असून तिच्या नवऱ्याने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Divorce : ‘बिग बॉस’ फेम महिला स्पर्धक सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून डान्सर सपना चौधरी आहे. सपना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच सपना हिने तिच्या वैवाहिक आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला आहे. सध्या सोशल मीडियावर समना हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये सपना मोठा पाऊल उचलताना दिसत आहे. ज्यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्याचं मोठं सत्य समोर आहे. 6 वर्ष जु्नं नातं आता मोडणार आहे… हे माहिती झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सपना चौधरीचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या मनगटावर असलेला वीर साहूच्या नावाचा टॅटू लेझर ट्रीटमेंटद्वारे काढून टाकताना दिसत आहे. वीर साहू हे सपना हिच्या नवऱ्याचं नाव आहे. हा व्हिडिओ एका लक्झरी सलून आणि परमनंट मेकअप आर्टिस्ट रिधी सिक्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची बाब समोर आल्यानंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर चाहते याकडे सपनाच्या आयुष्यात आलेल्या बदलाशी जोडून पाहत आहेत.
मात्र, टॅटू काढून टाकण्यामागे केवळ घटस्फोट हेच कारण आहे, याबद्दल कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही. कारण सपनाने यापूर्वीही टॅटू काढून टाकण्याबाबत वक्तव्य केलं होतं. तिचं म्हणणं होतं की, शूटिंगदरम्यान टॅटू लपवण्यात बराच वेळ जातो. तिला सिनेमे आणि म्युझिक प्रोजेक्ट्सवरही लक्ष केंद्रित करायचं आहे.
सपना चौधरी हिने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. यावेळी सपना हिने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं. सपना म्हणते, ‘जेव्हा सर्वकाही चांगलं होतं, तेव्हा आम्ही सोबत होतो… नाही काही गोष्टी चांगल्या नाहीत, त्यामुळे वेगळे आहोत… ‘, सपनाचं असं मत आहे की विवाह हा दोन व्यक्तींमधील संबंध आहे; त्यामुळे, या बाबतीत तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीने आपलं मत देऊ नये.
वीर साहू याची प्रतिक्रिया
सपना चौधरीची एका बाजूला लेझर ट्रीटमेंट करतानाची ही रील व्हायरल झाली. तर दुसऱ्या बाजूला नवरा वीर साहू याने देखील एक रील शेअर केली आहे, ज्यामध्ये तो योग्य वेळ येऊ देण्याकडे सूचक भाष्य करत आहेत. वीरचे चाहते या पोस्टवर प्रतिक्रियाही देत आहेत.
‘बिग बॉस 11’ मधून मिळाली देशभरात ओळख
सपना चौधरी हे हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिने आपल्या डान्स आणि गाण्यांमधून लोकप्रियता मिळवली. मात्र, सलमान खानच्या ‘बिग बॉस 11’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला देशभरात मोठी ओळख मिळाली. शोमधील तिच्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या शैलीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. यानंतर सपना अनेक म्युझिक व्हिडिओ आणि स्टेज शोमध्ये दिसली.