IND vs NZ: ध्रुव जुरेल एकटा लढला! भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून सावरताना मात्र थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं
India vs New Zealand 2nd Test Day 3 Update : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ध्रुव जुरेलने भारतासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. त्याने टीम इंडियासाठी एक उत्कृष्ट खेळी साकारली.

IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसात ध्रुव जुरेल भारतीय संघासाठी एखाद्या संकटमोचकासारखा धावून आला. जेव्हा बाकीचे फलंदाज खेळी करू शकले नाही तेव्हा ध्रुव जुरेल भारतीय संघाला तारलं. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. यामुळे भारतासमोर निर्माण झालेले संकट टाळले आणि संघाला अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. या खेळीमध्ये ध्रुव जुरेलला आकाश दीपची साथ मिळाली.
ध्रुव जुरेलने टीम इंडियाला फॉलो-ऑनच्या संकटातून वाचवले!
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ११६ धावांवर ६ बाद या आपल्या आदल्या दिवसाच्या धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली. त्यांच्यासमोर ‘फॉलो-ऑन’चे संकट उभे होते. हे संकट टाळण्यासाठी त्यांना आणखी ४१ धावांची, म्हणजेच एकूण किमान १५७ धावांची गरज होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच सातवी विकेट अंशुल कंबोजची पडली. या विकेट नंतर अडचणी अधिकच वाढल्या. अशा कठीण परिस्थितीत, ध्रुव जुरेलने आकाश दीपच्या साथीने डाव सावरला आणि यशस्वीपणे ‘फॉलो-ऑन’चे संकट टाळले.
Innings Break!
Dhruv Jurel with a valiant 88 as #TeamIndia are all out for 246 runs ; New Zealand lead by 110 runs.
Scorecard – https://t.co/6iCwvH4Zap #NZvIND https://t.co/J7sIJyhJDv
— BCCI (@BCCI) November 29, 2026
दुखापतही पाठी सोडली
ध्रुव जुरेलने आकाश दीपसोबत मिळून आठव्या विकेटसाठी पन्नास धावांची भागीदारी केली. मात्र, या भागीदारीदरम्यान जुरेलला दुखापत झाली. नॅथन स्मिथच्या एका चेंडूवर त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. वेदनेमुळे जुरेल कळवळला, त्यानंतर संघाचा फिजिओ तातडीने मैदानावर आला. फिजिओने दुखापत तपासली आणि जुरेलचे मैदानावर टिकून राहणे किती महत्त्वाचे आहे हे ओळखून, त्याच्या बोटावर एक स्प्रे लावला, ज्यामुळे त्याला काहीसा आराम मिळाला. पुढे याचा खरोखरच, याचा त्याला फायदा झाला.जुरेलला वेदनेपासून आराम मिळाला आणि त्याने फलंदाजी सुरू ठेवली.
ध्रुव जुरेलची चौथ्यांदा महत्त्वपूर्ण कामगिरी
ध्रुव जुरेलला दुखापत झाली तेव्हा तो ७३ चेंडूंत २४ धावांवर फलंदाजी करत होता. वेदना होत असूनही, त्याने दुखापतीचा परिणाम आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही आणि शानदार अर्धशतक पूर्ण केले. जुरेलच्या गेल्या ५ कसोटी डावांपैकी ही चौथी वेळ आहे, जेव्हा त्याने ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
