AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी पत्नीला न सांगता उचलले मोठे पाऊल, शबाना आझमी यांना कळलं अन्…

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी अलीकडेच त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी पत्नी शबाना आझमी यांना न सांगता मोठे पाऊल उचलले होते. आता नेमकं काय केलं होतं एका? वाचा...

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी पत्नीला न सांगता उचलले मोठे पाऊल, शबाना आझमी यांना कळलं अन्...
Javed Akhtar and Shabana AzmiImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 8:21 AM
Share

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी. त्यांना एकत्र येऊन ४० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघंही अनेकदा एकमेकांशी संबंधित मजेदार किस्से सांगत असतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय त्यांनी परस्पर घेतला होता. पण जेव्हा शबाना आझमी यांना कळाले तेव्हा नेमकं काय झालं? वाचा…

भारतीय क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांच्यासोबतच्या संवादात जावेद अख्तर यांनी प्रेक्षकांना हा मजेदार किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की सुमारे १५-१६ वर्षांपूर्वी त्यांची नजर कमकुवत होऊ लागली होती, त्यामुळे त्यांना डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जावं लागलं होतं. डॉक्टरांनी त्यांना दूरच्या नजरीसाठी एक चष्मा लिहून दिला. दुसरा चष्मा जवळच्या नजरीसाठी दिला. मात्र, त्याच डॉक्टरांनी त्यांना एका सर्जरीबद्दल सांगितलं, ज्यामुळे त्यांची समस्या दूर होऊ शकते.

शबाना आझमी काय म्हणाल्या?

जावेद अख्तर म्हणाले की, “मी शबानांना सांगितलं की एक प्रक्रिया आहे ज्यामुळे माझी दूरची आणि जवळची दोन्ही नजर सुधारेल. त्या म्हणाल्या, तुम्ही आंधळे व्हाल! या सगळ्यात पडू नका. आणि तुम्ही काही ग्रीक देव आहात का की चष्मा घालू शकत नाही? हो शांत.”

शबाना आझमी यांच्यापासून लपवून केली डोळ्यांची सर्जरी

जावेद अख्तर यांनी सांगितलं की त्यावेळी ते पत्नीच्या बोलण्याशी सहमत झाले, पण त्यांचे काही वेगळेच प्लॅन होते. त्यांनी पत्नीपासून लपवून डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतली होती. शबाना जेव्हा देशाबाहेर प्रवास करत होत्या, तेव्हा जावेद अख्तर यांनी डोळ्यांची सर्जरी करून घेतली. जावेद अख्तर यांनी सांगितलं की सर्जरीनंतर जेव्हा त्यांनी पहिल्यांदा डोळे उघडले, तेव्हा त्यांना वाटलं की त्यांच्या बाजूला दोन नर्सेस बसल्या आहेत. नर्सेस म्हणाल्या होत्या की त्या त्यांना सांगतील की कधी जायचं आहे, तोपर्यंत त्यांना वाट पाहावी लागेल. पण थोड्या वेळानंतर त्यांना जाणवलं की प्रत्यक्षात तिथे फक्त एकच नर्स होती.

झोपतानाही जावेद अख्तर यांना चष्मा घालावा लागायचा

जावेद अख्तर यांनी सांगितलं की जेव्हा ते घरी गेले तेव्हा डॉक्टरांनी डोळ्यांच्या संरक्षणासाठी त्यांना चष्मा दिले होते. ते चष्मे त्यांना झोपतानाही घालावे लागत होते. यासोबत डॉक्टरांनी डोळ्यात टाकण्यासाठी औषधही दिलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तीन दिवसांनी ते चष्मा काढू शकतात.

१०० वर्षांच्या वयातही डोळे ठीक राहतील

जावेद अख्तर यांनी पुढे सांगितले की, “तीन दिवसांनंतर मी चष्मा काढला आणि पाहिलं की आमच्या घरी रंगीत टीव्ही आहे. तो पाहून खूप छान वाटलं होतं.” जावेद अख्तर यांनी सांगितलं की ते नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आणि धोका पत्कारण्यासाठी का तयार असतात. ते म्हणाले की ते लोकांना सांगतात की जेव्हा ते १०० वर्षांचे होतील तेव्हा कदाचित त्यांचे केस गळून गेले असतील, दात नसतील, सुरकुत्या आल्या असतील, गुडघे खराब झाले असतील, पण त्यांचे डोळे ठीक राहतील.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!