AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Case : बंद दाराआडची ‘ती’ चौकशी अन् सुपरस्टारच्या मुलाचे अश्रू… अधिकाऱ्यांसमोर उच्चारलेले ‘ते’ शब्द ऐकून व्हाल थक्क!

Aryan Khan Case : माजी NCB अधिकारी आणि SIT प्रमुख राहिलेले संजय कुमार सिंह यांनी आपल्या पुस्तकात 2021 मध्ये झालेल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील चौकशीबद्दल लिहिलं आहे. चौकशीदरम्यान बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा रडू लागला होता, असं देखील त्यांनी सांगितले.

Aryan Khan Case : बंद दाराआडची 'ती' चौकशी अन् सुपरस्टारच्या मुलाचे अश्रू... अधिकाऱ्यांसमोर उच्चारलेले 'ते' शब्द ऐकून व्हाल थक्क!
Aryan Khan
| Updated on: Nov 29, 2026 | 7:58 AM
Share

Aryan Khan Case : अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये सुरु असतात. पण तेव्हा चर्चांना उधाण आलं जेव्हा किंग खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स केसमध्ये अटक केलेली. 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री कॉर्डेलिया क्रूजवर छापेमारी करण्यात आली आणि 2 ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खान याला अटक करण्यात आली. जवळपास 1 महिना आर्यन तुरुंगात होता. आता, या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्व केलेले निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी संजय कुमार सिंह यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. चौकशीदरम्यान बॉलिवूडच्या सुपरस्टारचा मुलगा रडू लागला होता, असे त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

NCB च्या चौकशी दरम्यान सुपरस्टारने उपस्थित केले प्रश्न

संजय कुमार सिंह यांनी ‘कोड ऑफ ऑनर’ या पुस्तकात कोणाचंन नाव न घेता लिहिलं आहे की, चौकशी सुरु होती आणि तो सतत रडत होता. त्याने चौकशीच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. संजय कुमार सिंह आपल्या पुस्तकात सांगितलं आहे की, बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाने त्यांना म्हटलं होतं, “सर, तुम्ही तर मला आंतरराष्ट्रीय तस्कर बनवून टाकलं, तुम्ही मला ड्रग्ज फायनान्सर बनवून टाकलं, हे योग्य आहे का? एनसीबीला (NCB) तर माझ्याकडून कोणतेही ड्रग्जही सापडले नव्हते.”

चौकशी दरम्यान रडू लागला बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा…

सिंग यांनी याबद्दल बोलताना कोणत्याच सेलिब्रिटीचं नाव घेतलं नाही. पण वाटत आहे की, त्यांनी जो प्रसंग सांगितला आहे, तो शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा असू शकतो… संजय लिहितात, ‘संपूर्ण घटना सांगत असताना, सेलिब्रिटीचा मुलगा सतत रडतच होता. त्याच्या भावना सत्य होत्या आणि स्पष्ट होतं, चौकशी दरम्यान आणि मीडियामध्ये सुरु असलेल्या गोष्टींचा त्याच्यावर फार वाईट परिणाम झालेला.’

2022 मध्ये आर्यन खानवर लावलेले आरोप फेटाळण्यात आले

आर्यन खान प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, SIT च्या तपासानंतर NCB ने मे 2022 मध्ये आर्यन आणि इतर पाच जणांवर लावलेले आरोप फेटाळून लावले होते. SIT ने केवळ 14 आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केले होते. SIT ला आपल्या तपासात असं आढळून आलं की, मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुरुवातीच्या तपासात पुरावे गोळा करण्याच्या पद्धतीत त्रुटी होत्या. याप्रकरणात आर्यन खान याला आता क्लिनचीट मिळाली आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!