AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी माणूस थांबता कामा नये.. म्हणत हा अभिनेता मराठीसाठी थेट रस्त्यावर, म्हणाला, कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर थांबवा आणि..

मराठी सक्तीचा मुद्दा राज्यात गाजत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आग्रही आहेत. त्यामध्येच अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी या मुद्द्यात आपले मत मांडले. आता एक अभिनेता थेट मदतीला धावला आहे.

मराठी माणूस थांबता कामा नये.. म्हणत हा अभिनेता मराठीसाठी थेट रस्त्यावर, म्हणाला, कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर थांबवा आणि..
Marathi actor
| Updated on: Apr 29, 2026 | 1:07 PM
Share

1 मेपासून मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रकरणी आग्रही आहेत. मात्र, या मुद्द्यात शिंदेंच्या शिवसेनेत दोन गट बघायला मिळाली. एकदम निर्णय लादल्यास त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. यादरम्यान प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे. रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला. 1 मेपासून मराठी सक्तीचे पालन केले जाणार आहे. मात्र, तात्काळ कारवाई केली जाणार नाही. काही संघटनांनी 4 मे रोजी राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संपाची निर्णय घेतला. मात्र, त्या संपाबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पण यादरम्यानच एक मराठी अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे लोकांच्या मदतीला धावला आहे.

शिव ठाकरे याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लोकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. शिव ठाकरे याने पोस्ट शेअर करत म्हटले की, राम राम महाराष्ट्र… 4 मे रोजी टॅक्सीचालक यांचा संप आहे. तरीही आपल्या सेवेत कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर तुमच्या हक्काची टॅक्सी रिक्षा कुठेही दिसल्या हक्काने थांबवा. आपली खूप एकच.. गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र…

आणि चालक सीटवर भगवा फेटा असलेला दादा आपल्या सेवेत सदैव तत्पर… काहीही ह… मराठी माणूस थांबता कामा नये.. तुमचा शिव ठाकरे… अशी पोस्ट शिव ठाकरे याने शेअर केली. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही संघटना याविरोधात आंदोलन करणार नाहीत. मात्र, शिव ठाकरे याने आपल्या माणसांसाठी एक मदतीचा हात पुढे केला.

Shiv Thackeray

शिव ठाकरे याची ही पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे. फक्त शिव ठाकरे हाच नाही तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी या मुद्द्यात आपले मत मांडले. अनेकांनी थेट पणे भूमिका घेत म्हटले की, इथे काम करायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे. त्यामध्ये आता शिव ठाकरे हा थेट मदतीकरिता पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मराठी सक्तीचा मुद्दा राज्यात गाजत आहे.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन