
अवघे दोन जोडी कपडे, तुटलेल्या चपला आणि चेहऱ्यावर साधेभोळे भाव.. बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये आलेला हा तरूण पुढे जाईल, सर्वांना मागे टाकून तोच या शोचा विजेता ठरेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण सर्व अंदाज फोल ठरवत, भल्याभल्यांना नमवत, साध्याभोळ्या वाणीने लोकांच्या मनात घर करत सुरज चव्हाण याने बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) सीझन 5 चं विजेतेपद पटाकवत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. त्या एका विजयाने त्याचं नशीब बदललं, यशाचे दरवाजे उघडले. रिॲलिटी शो जिंकला, झापूक झुपूकमधून केदार शिंदे यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकासोबत काम करत मोठ्या पडद्यावर झळकला, सुरजची (Suraj Chavan)घोडदौड वेगाने सुरूच असून त्याने कित्येक वर्षांपूर्वी पाहिले घराचं स्वप्नही अखेर पूर्ण झालं..
बारामतीच्या मोढवे गावचा हा मुलगा आता घराघरांत पोहोचला असून त्याचं आलिशान घर बांधून नुकतंच तयार झालं. या महिन्याअखेरीस बोहोल्यावर चढून आयु्ष्याच्या नव्या प्रवासाची सुरूवात करणाऱ्या सुरजने, नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. सोशल मीडियावरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवर काल त्याने याबद्दलचा एक व्हिडीोही शेअर केला असून त्यामध्ये त्याच्या आलिशान घराची झलकही दिसत आहे. पत्र्याची खोली ते मोठा, आलिशान, सुख-सोयींनी सज्ज असा बंगला हे ट्रॉन्स्फॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले असून सुरजच्या घराच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर 20 लाखांपेक्षा लाईक्स आले आहेत आणि शेकडोंनी कमेंट्सही केल्या आहेत.
अजित पवारांनी केली कमेंट
मात्र या सगळ्यांतील खास कमेंट होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. बिग बॉस जिंकल्यानंतरगेल्या वर्षी सूरजने अजित दादांची भेट घेतली होती, तेव्हा त्याच्याकडे रहायल घर नाही हे अजित पवार यांना समजलं होतं. याआधी बिग बॉसच्या घरात असताानही सूरज या मुद्यावर बोलला होता, मात्र अजित पवार यांना सुरजच्या घराच्या स्थितीबद्दल कळताच त्यांनी त्याला एकदम चांगलं घर बांधून देणार असं जाहीर केलं. त्यानंतर वर्षभराने सूरजचं घर बांधून पूर्ण होऊन काल गृहप्रेवशही झाला. त्यावर कमेंट करत अजित पवार यांनी सुरजचे अभिनंदन करत घराबद्दल आणि भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
सूरजची अजित दादांसाठी खास पोस्ट
याच सुरजने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करतानाच त्यासोबत एक खास पोस्टही लिहीली असून त्यात अजित पवार यांचा खास उल्लेख आहे. ” आज केला माझ्या नवीन घराचा गृह प्रवेश ❤️🙏 आदरणीय अजितदादा पवार, फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणारेंचे देखील मनःपूर्वक आभार!” असं म्हणत सूरजने अजित पवार यांचे खास आभार मानले. तसेच घरासाठी व आयुष्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या अभिनंदन करणाऱ्यांनाही सुरजने धन्यवाद दिले आहेत.
सुरज चव्हाण याची अजित पवार यांच्यासाठी खास पोस्ट
Suraj Chavan : गुलिगत किंग सुरज चव्हाण चढणार बोहल्यावर… लग्नपत्रिका सर्वात हटके, तुम्ही पाहिली का?
29 नोव्हेंबरला सुरज चढणार बोहोल्यावर
दरम्यान येत्या 29 नोव्हेंबरला सुरज चव्हाण हा बोहोल्यावर चढणार आहे. त्याच्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी तो विवाहबद्ध होणार असून त्यांचं हे लव्ह मॅरेज असल्याचं समजतं. यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिताने त्यांचं केळवण करत सूरजच्या होणाऱ्या बायकोची सर्वांना ओळख करून दिली होती, तसेच त्यांच्यासोबत लग्नाच्या खरेदीस जाऊन दागिने, साड्या घेण्यासही मदत केली होती. आता सुरजच्या लग्नाची हटके पत्रिका देखील समोर आली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 29 तारखेलाच दुपारी सुरज– संजना यांचा साखरपुडा पार पडणार असून त्यानंतर दुपारी 3 ला हळद आणि संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी त्या दोघांचा विवाह होणार आहे.