Suraj Chavan : गुलिगत किंग सुरज चव्हाण चढणार बोहल्यावर… लग्नपत्रिका सर्वात हटके, तुम्ही पाहिली का?
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण खूप लोकप्रिय आहे. त्याच्या आयुष्यातील नवा टप्पा सुरू होत असून या लवकरच त्याचं लग्न होणार आहे. त्याच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून लग्न कधी, कुठे, कोणत्या मुहूर्तावर होणार ते सगळंच जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन गाजवला, त्याचं विजेतेपदही मिळवलं. साधा-भोळा दिसणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) सगळ्यांना मागे टाकून बाजी मारून गेला. नंतर केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ मधून तो मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसला. चित्रपट फार चालला नाही, पण चाहत्याचं प्रेम खूप मिळालं. सूरज आयुष्य़ात नवनवे टप्पे ओलांडत असून यशाच्या शिखराकडे एकेक पाऊल टाकत आहे. अनेक वर्षांचं स्वप्न असलेलं त्याचं घरंही आता बांधून पूर्ण झालं असून नुकताच सूरजने गृहप्रवेशही केला. त्याचा एक सुंदर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये सूरजचा आलिशान घराची झलकही दिसत आहे.
आता याच सूरजच्या आयुष्याचा नवा टप्पाही सुरू होत असून या महिन्याच्या अखेरीस तो लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सूरजने लग्नाचे संकेत दिले होते. त्यानंतर बिग बॉसमध्येच सूरज सोबत असलेली, कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभ वालावलकर हिने सूरजचे आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे केळवण केलं . त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आणि त्यातूनच सूरजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव, ती कोण आहे सर्वांना समजलं. आता तर सूरजच्या लग्नाची पत्रिकाह समोर आली असून त्याचं लग्न नेमकं कधी, कुठे आणि कोणत्या मुहूर्तावर होणार, हे सगळं त्यातून स्पष्ट झालं आहे.
अरेंज हे लव्ह मॅरेज
सूरजचं लग्न हे अरेंज मॅरेज नसून ते लव्ह मॅरेज आहे. तो त्याच्या चुलत मामाच्या मुलीशीच लग्न करणार असून संजना असं त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नावं आहे. विशेष म्हणजे, त्या दोघांचं हे अरेंज मॅरेज नसून चक्क लव्ह मॅरेज आहे, दोघंही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी सर्वच उत्सुक आहेत. येत्या 29 तारखेला म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी संजना-सूरज विवाहबद्ध होणार आहेत.
View this post on Instagram
Suraj Chavan : सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण ? अखेर चेहरा दिसलाच.. अंकिताने थाटात केलं केळवण
सूरजच्या लग्नाची पत्रिका आली समोर
28 नोव्हेंबर पासून त्यांच्या लग्नाचे सर्व विधि होणार आहेत. मेहंदी, हळद वगैरेही होणार असून आता सूरजच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. त्याच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावर लग्नपत्रिका शेअर केली आहे. या पत्रिकेनुसार, कै. दत्तात्रय नारायण चव्हाण यांचा मुलगा सूरज आणि श्री. ज्ञानेश्वर विलास गोफणे यांची द्वितीय कन्या चि.सौ.का संजना यांचा विवाह येत्या 29 नोव्हेंबरला होणार असून संध्याकाळी 6 वाजून 11मिनिटांचा मुहूर्त आहे. माऊली गार्डन हॉल, (गोटेमाळ) खळद, सासवड-जेजुरी रोड, ता. पुरंदर, जि, पुणे येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
सूरज संजनाच्या विवाहासाठी, त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी आणि सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुत असून चाहत्यांनी त्या दोघांना विवाहासाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
