
बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व गाजवत विजेता ठरलेला , सोशल इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण हा बराच लोकप्रिय आहे. त्यानंतर केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ मधून तो मोठा पडद्यावर दिसला. चित्रपट फारसा चालला नसला तरी सूरजची घराघरात चर्चा झाली. हाच सूरज चव्हाण त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असून त्याच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होत आहे. सूरजचा काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरलं, त्याने होणाऱ्या बायकोसबोतचे फोटोही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव इन्स्टाग्रामवरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केले होते. मात्र असं असलं तरीही त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव, तिचा चेहरा कोणालाच दाखवला नव्हता. त्यामुळेच सूरजची होणारी पत्नी कोण हे पाहण्याची चाहत्यांच्या मनात मोठी उत्सुकता होती.
आता अखेर चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे, कारण सूरज चव्हाण याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा समोर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सूरजसोबत असलेली, आणखी एक सोशल मीडिया इनफ्लुएन्सर म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर. ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिनेच सूरजच्या होणाऱ्या पत्नीचं नावं, तिचा चेहरा दाखवला आहे. त्याचं कारणही असंच खास होतं, ते म्हणजे सूरजचं केळवण…
अंकिताने दाखवला होणाऱ्या वहिनीचा फोटो, नावही केलं जाहीर
‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थाl अंकिताच्या घरी नुकतंच सूरजचं केळवण पार पडलं, त्यावेळी त्याची होणार पत्नीही सोबत होती. तिचा नाव आहे संजना.. अंकिताच्या घरी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून, छान सजावट करून सूरज आणि संजनाचं केळवण थाटात पार पडलं. अंकिताने प्रेमाने दोघांसाठी अनेक पदार्थ बनवले होते. त्यावेळी सूरजने उखाण्यातून पत्नीचं नावही जाहीर केलं.
सूरजने घेतला खास उखाणा
या केळवणाच्या वेळी सूरज पिवळ्या रंगाची हुडी आणि क्रीम कलरच्या पँटमध्ये दिसला तर त्याची होणारी पत्नी संजना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुरेख दिसत होती. अंकिताने त्यांचं औक्षण केलं, केळवण थाटात पार पडल. जेवण सुरू करण्यापूर्वी दोघांनी नाव घेतलं, त्या उखाण्यातूनच सुरूजने होणाऱ्या पत्नीचं नाव जाहीर केलं. “बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण.. संजनाच नाव घेतो, बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न” असा छानसा उखाणा सूरजने घेतला.
अंकिताने शेअर केला व्हिडीओ
त्यानंतर त्याची होणार पत्नी संजना हिनेनही मजेशीर उखाण्यातून सूरजनचं नाव घेतलं. “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको” असा उखाणा तिने घेतला.
अंकिताने सूरज संजनासाठी आखस जेवणाचा बेत केला होता. तसंच त्यांना अनेक गिफ्टसही दिली. तिने या केळवणाचा खास व्हिडीओ आणि फोटो शेअर केले असून सुरज आणि संजना .. सूरजचं केळवण !अशी खास कॅप्शनही यासोबत दिली.
या फोटंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा पाऊस पाडत, सूरजचं अभिनंदन केलं. सूरजच्या लग्नाची तारखी अद्याप जाहीर झाली नसल्याने अनेकांनी त्याबद्दलही प्रश्न विचारले, तर काही चाहत्यांनी अभिनंदन करत होणारी वहिनी छान असल्याचे म्हणत कौतुकही केलं.