Bigg Boss OTT 2 | अभिषेक मल्हान की एल्विश यादव? कोण ठरणार विजेता? अभिनेत्याने केला खुलासा

वोटिंग ट्रेंडनुसार अभिषेक मल्हान आघाडीवर आहे तर एल्विश दुसऱ्या क्रमांकावर आहे. मनीषा राणी तिसऱ्या आणि पूजा भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे. तर बेबिका धुर्वे ही पाचव्या क्रमांकावर आहे. काही तासांपूर्वी समोर आलेल्या मतदानाच्या कलानुसार एल्विश आघाडीवर होता.

Bigg Boss OTT 2 | अभिषेक मल्हान की एल्विश यादव? कोण ठरणार विजेता? अभिनेत्याने केला खुलासा
Abhishek Malhan and Elvish Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2023 | 3:53 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनच्या ग्रँड फिनालेसाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकजण त्यांच्या आवडत्या स्पर्धकासाठी भरभरून मतं देत आहेत. अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि बेबिका धुर्वे या पाच जणांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. मात्र सोशल मीडियावर सर्वांत जास्त क्रेझ ही अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यासाठी पहायला मिळतेय. या दोघांपैकीच कोणीतरी बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन जिंकणार असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. अशातच बिग बॉसच्या आठव्या सिझनचा विजेता गौतम गुलाटी याने एक पोस्ट लिहित मोठा खुलासा केला आहे.

गौतमने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अभिषेक आणि एल्विशसोबतच दोन सिंहांचा फोटो पहायला मिळतोय. त्यावर गौतमीने लिहिलं, ‘रिअॅलिटी शोच्या जंगलात अभिषेक आणि एल्विश या दोन सिंहांनी उत्कृष्ट खेळ दाखवला. या दोघांनी बिग बॉसच्या घरात दाखवलेल्या शक्तीसाठी आणि त्यांच्या उत्तम खेळीसाठी मी त्यांची साथ देतो. ट्रॉफी जरी एकासाठी असली तरी माझा या दोघांना पाठिंबा आहे. मी स्वत: तिथे जाऊन त्यांची भेट घेऊ शकत नाही पण इथूनच मी त्या दोघांना शुभेच्छा देतो.’ अभिषेक आणि एल्विश या दोघांना पाठिंबा देत असतानाच गौतमने विजेता म्हणून ‘फुकरा इन्सान’ म्हणजेच अभिषेकचंच नाव घेतलं आहे.

वोटिंग ट्रेंडनुसार अभिषेक मल्हान आघाडीवर आहे तर एल्विश दुसऱ्या क्रमांकावर आहे. मनीषा राणी तिसऱ्या आणि पूजा भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे. तर बेबिका धुर्वे ही पाचव्या क्रमांकावर आहे. काही तासांपूर्वी समोर आलेल्या मतदानाच्या कलानुसार एल्विश आघाडीवर होता. त्यामुळे अंतिम चुरस ही अभिषेक आणि एल्विश यांच्यातच रंगणार असल्याचं दिसतंय.

कोण पटकावणार विजेतेपद?

अभिषेक मल्हान हा पहिल्या दिवसापासून जरी सोशल मीडियावर चर्चेत असला तरी फिनालेच्या आठवड्यापर्यंत त्याचीच खेळी त्याच्यावर भारी पडताना दिसतेय. त्याचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास यशाच्या मार्गातील अडथळा बनू शकतो. याच गोष्टीचा फायदा एल्विशला मिळू शकतो आणि तो विजेतेपद पटकावू शकतो.