तीन गर्लफ्रेंडचा खर्च उचलतो ‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर; महिन्याची कमाई जाणून व्हाल हैराण

एक दोन नाही तर, प्रसिद्ध युट्यूबरच्या आहेत चक्क तीन गर्लफ्रेंड, सर्वांसमोर युट्यूबरने केला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलाला... महिन्याची कमाई जाणून व्हाल हैराण

तीन गर्लफ्रेंडचा खर्च उचलतो हा प्रसिद्ध युट्यूबर; महिन्याची कमाई जाणून व्हाल हैराण
| Updated on: Jul 17, 2023 | 4:26 PM

मुंबई, 17 जुलै 2023 : झगमगत्या विश्वात कायम प्रेम, ब्रेकअपच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण आता सोशल मीडिया स्टार्सचं देखील खासगी आयुष्य लोकांना कळत आहे. यामागे कारण आहे, ते म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये नुकताच झालेली वाईल्ड कार्ड एन्ट्री. सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस ओटीटी २ नेहमीच चर्चेत राहतो. सध्या बिग बॉस ओटीटी शो वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे चर्चेत आला आहे. टीव्हीवरील वादग्रस्त शोमध्ये आशिका भाटिया आणि यूट्यूबर एल्विश यादव यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. एल्विशने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच खळबळ उडवून दिली आहे. सध्या सर्वत्र युट्यूबरची चर्चा रंगत आहे. एवढंच तर एल्विश त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.

एल्विश याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, युट्यूबरची एक गर्लफ्रेंड होती. जिचं नाव किर्ती मेहरा असं होतं. एल्विश कायम किर्ती हिच्यासोबत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करायचा. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सोशल मीडियावर तुफान रंगल्या होत्या. एल्विशच्या चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं.

दोघे कायम एकमेकांच्या सोबत असायचे आणि चांगल्या – वाईट काळात एकमेकांचा साथ द्यायचे. पण दोघांमध्ये काही कारणांमुळे भांडण झालं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एल्विश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये तरुणींची संख्या फार मोठी आहे.

सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरातील एल्विश कायम चर्चेत राहणारा सदस्य आहे. बिग बॉस ओटीटी २ च्या एका एपिसोडमध्ये एल्विश याला मुलींनी घेरलं होतं. यावेळी एल्विश त्याच्या तीन गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसला. बाबिका धार्वे एल्विशला विचारते की तुला बाहेर गर्लफ्रेंड आहेत, यावर यु्ट्यूबर म्हणतो, हो माझ्या बाहेर तीन गर्लफ्रेंड आहेत. एल्विश सध्या त्याच्या तीन गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे.

एल्विशच्या तीन गर्लफ्रेंडबद्दल चर्चा रंगल्यामुळे युट्यूबरच्या कमाईबद्दल देखील अनेक चर्चा रंगत आहेत. एल्विश याने २०१६ मध्ये स्वतःचं युट्यूब चॅनल सुरु केलं. एल्विश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. यु्ट्यूबवर एल्विश याचे तब्बल १४.५ मिलियन पेक्षा देखील अधिक सब्सक्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल ६.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर एल्विश कायम सक्रिय असतो. एल्विश याच्या महिन्याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, युट्यूबर महिन्याला जवळपास १० लाख रुपये कमावतो. म्हणजे एल्विश वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.