AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himesh Reshammiya चं पत्नीच्या मैत्रीणीवरच जडला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी गायकाने उचललं मोठं पाऊल

मैत्रीणच झाली सवत... प्रेमासाठी हिमेश रेशमिया याने मोडला २२ वर्षांचा संसार; दुसऱ्या लग्नासाठी गायकाने स्वीकारला अनेकांचा विरोध.. कोण आहे गायकाची दुसरी पत्नी?

Himesh Reshammiya चं पत्नीच्या मैत्रीणीवरच जडला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी गायकाने उचललं मोठं पाऊल
| Updated on: Jul 17, 2023 | 3:17 PM
Share

मुंबई, 17 जुलै 2023 : गायक हिमेश रेशमिया याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हिमेश याने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर झगमगत्या विश्वात भक्कम ओळख निर्माण केली. पण एक दिवस असा आला जेव्हा कायम आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असणारा हिमेश रेशमिया त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. हिमेश रेशमिया याने पत्नीच्या मैत्रीणीसोबतच गुपचूप लग्न केलं. तेव्हा अनेकांनी गायकाचा विरोध देखील केला. हिमेश रेशमिया याने दुसऱ्या प्रेमासाठी २२ वर्षांचा संसार मोडला. महत्त्वाचं म्हणजे पतीच्या सुखासाठी हिमेश रेशमिया याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. तर कशी होती गायकाची लव्हस्टोरी जाणून घेवू..

विवाहित असताना देखील हिमेश रेशमिया यांचा जीव पत्नीची मैत्रीण सोनिया कपूर हिच्यावर जडला. गायकाचा ज्या तरुणीवर जीव जडला होती, तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. एवढंच नाही तर सोनिया हिमेश याची पहिली पत्नी कोमल हिची फार चांगली होती.

सोनिया आणि हिमेश एकाच इमारतीत रहायचे. म्हणून सोनिया हिचं हिमेश – कोमल यांच्या घरात येणं – जाणं असायचं. हिमेश आणि सोनिया यांची पहिली भेट देखील गायकाची पहिली पत्नी कोमल हिच्यामुळेच झाली होती. पण कोमल हिला काय माहिती होतं, की सोनिया तिचं संसार मोडेल आणि मैत्रीणच आपली सवत होईल.

सोनिया आणि हिमेश यांनी २००६ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पण पतीच्या अफेअरबद्दल कोमल हिला काहीही माहिती नव्हतं. हिमेश सोनियाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. एवढंच नाही तर गायकाने २२ वर्षांचा संसार देखील मोडला. अशात कोमल आणि हिमेश यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झालं.

एका मुलाखतीत हिमेशने कबूल केले की कोमल आणि त्याने परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. कोमल आणि हिमेशला एक मुलगाही आहे, ज्याची काळजी दोघेही घेत आहेत. तेव्हा हिमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला होता.

इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी गायकांमध्ये गणल्या जाणार्‍या हिमेशने १२ सोनिया हिला डेट केलं. ११ मे २०१८ मध्ये हिमेश आणि सोनिया यांनी लग्न केलं. हिमेश आणि सोनिया लोखंडवाला येथील अपार्टमेंटमध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

हिमेश आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. गायक कायम दुसरी पत्नी सोनिया हिच्यासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर देखील गायकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील गायकाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?