Abhishek Malhan | ‘बिग बॉस’च्या घरातून थेट पोहोचला रुग्णालयात; अभिषेक मल्हानला झाला हा आजार

| Updated on: Aug 15, 2023 | 11:32 AM

'लवकरच बरा हो भाऊ', असं एकाने लिहिलं. तर 'ट्रॉफी जिंकू शकला नाहीस तरी आमचं मन मात्र जिंकलंस' असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 'तू आधीपासूनच विजेता होतास. फक्त ट्रॉफी मिळू शकली नाही', असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

Abhishek Malhan | बिग बॉसच्या घरातून थेट पोहोचला रुग्णालयात; अभिषेक मल्हानला झाला हा आजार
Abhishek Malhan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी 14 ऑगस्ट रोजी पार पडला. सूत्रसंचालक सलमान खानने एल्विश यादवला या सिझनचा विजेता म्हणून घोषित केलं. तर एल्विशला तोडीस तोड टक्कर देणारा अभिषेक मल्हान या शोचा फर्स्ट रनर अप ठरला आणि मनीषा राणी सेकंड रनर अप ठरली. या ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये फुकरा इन्सान म्हणजेच अभिषेक गैरहजर होता. कारण त्याची तब्येत अचानक बिघडली होती. आता शो संपल्यानंतर त्याने रुग्णालयातील एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचसोबत अभिषेकने तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत.

रुग्णालयातून शेअर केला व्हिडीओ

अभिषेकला डेंग्यूचं निदान झालं आहे आणि रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून व्हिडीओ शेअर करत अभिषेकने म्हटलं की, “मी काही लोकांना निराश केलं असेन कारण मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही. मात्र एल्विशला ही ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.” त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘लवकरच बरा हो भाऊ’, असं एकाने लिहिलं. तर ‘ट्रॉफी जिंकू शकला नाहीस तरी आमचं मन मात्र जिंकलंस’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘तू आधीपासूनच विजेता होतास. फक्त ट्रॉफी मिळू शकली नाही’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. अभिषेक मल्हानचे इन्स्टाग्रामवर 4.6 दशलक्ष फॉलोअर्स आणि युट्यूबवर 7.42 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.

अभिषेकचे युट्यूबवर तीन विविध चॅनल्स आहेत. फुकरा इन्सान लाइव्ह (2.18 दशलक्ष सबस्क्राइबर्स), मल्हान रेकॉर्ड्स (292K सबस्क्राइबर्स), फुकरा इन्सान शॉर्ट्स (527K सबस्क्राइबर्स) अशी त्यांची नावं आहेत. अभिषेकचा भाऊ आणि आईसुद्धा व्लॉगर आहेत. आई डिंपल मल्हानचे 2.37 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत तर भाऊ निश्चय ट्रिगर्ड इन्सान या नावाने युट्यूब चॅनल चालवतो. अभिषेक मल्हान त्याच्या युट्यूब चॅनलद्वारे दर महिन्याला जवळपास 10 ते 12 लाख रुपये कमावतो. तो संगीतकारसुद्धा आहे. त्याची एकूण संपत्ती दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.