AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT 2 Winner | सेलिब्रिटींना रोस्ट करून प्रसिद्ध झाला एल्विश यादव; जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही

सुरुवातीला एल्विश यादव रोस्टिंगचे व्हिडीओ बनवायचा. यादरम्यान त्याने बऱ्याच सेलिब्रिटींनाही रोस्ट केलं होतं. एका व्हिडीओवरून अभिनेत्री स्वरा भास्करने त्याच्याविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली होती.

Bigg Boss OTT 2 Winner | सेलिब्रिटींना रोस्ट करून प्रसिद्ध झाला एल्विश यादव; जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही
Elvish Yadav Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 15, 2023 | 7:52 AM
Share

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : जवळपास आठ आठवड्यांच्या धमाकेदार सिझननंतर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी पार पडला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली. युट्यूबर एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी 2 चं विजेतेपद जिंकलं. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 13.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर हरयाणाचा एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे. अवघ्या 25 व्या वर्षी एल्विशने हे यश संपादन केलं आहे.

वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या एल्विश यादवने त्याच्या हरयाणवी अंदाजाने लोकांच्या मनावर राज्य केलं. त्याने 2016 मध्ये युट्यूबर म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. 25 वर्षांचा एल्विश यादव हरयाणामधील गुरुग्राममध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच्या याच देसी अंदाजामुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याला युट्यूबवर लाखो लोक फॉलो करतात. त्याचे एक नाही तर तीन वेगवेगळे युट्यूब चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. ‘एल्विश यादव’ या चॅनलवर तो त्याचे लहान आणि मजेशीर व्हिडीओ पोस्ट करतो. तर दुसऱ्या ‘एल्विश यादव व्लॉग्स’ या चॅनलवर तो दररोजचे व्लॉग्स पोस्ट करतो.

सुरुवातीला एल्विश यादव रोस्टिंगचे व्हिडीओ बनवायचा. यादरम्यान त्याने बऱ्याच सेलिब्रिटींनाही रोस्ट केलं होतं. एका व्हिडीओवरून अभिनेत्री स्वरा भास्करने त्याच्याविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली होती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबतच तो एक एनजीओसुद्धा चालवतो. इतकंच नव्हे तर त्याचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँडसुद्धा आहे. यातूनही तो चांगली कमाई करतो. याबद्दलची माहिती त्याने स्वत: बिग बॉसच्या घरात दिली होती.

रिपोर्ट्सनुसार, एल्विश यादव दर महिन्याला जवळपास 8 ते 10 लाख रुपयांची कमाई करतो. त्याला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये फॉर्च्युनर, ह्युंडाइ वेर्ना, सेडान आणि पोर्शे या गाड्यांचा समावेश आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?