AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elvish Yadav | कोट्यावधी संपत्तीचा मालक, लग्झरी गाड्यांचे कलेक्शन, एका महिन्याला कमावतो तब्बल इतके लाख, जाणून घ्या ‘बिग बाॅस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव याच्याबद्दल

नुकताच एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरला आहे. विशेष म्हणजे एक मोठा इतिहास हा एल्विश यादव याने रचला आहे. अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यामध्ये मोठी चुरस ही शेवटपर्यंत बघायला मिळाली. एल्विश यादव हा धमाकेदार गेम खेळताना बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये दिसला होता.

Elvish Yadav | कोट्यावधी संपत्तीचा मालक, लग्झरी गाड्यांचे कलेक्शन, एका महिन्याला कमावतो तब्बल इतके लाख, जाणून घ्या 'बिग बाॅस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव याच्याबद्दल
| Updated on: Aug 15, 2023 | 1:21 AM
Share

मुंबई : नुकताच एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा विजेता ठरला आहे. धमाकेदार असा ग्रँड फिनाले हा नुकताच पार पडलाय. विशेष म्हणजे सलमान खान हा बिग बाॅस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले (Grand Finale) होस्ट करताना दिसला. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे हे देखील बिग बाॅसच्या ग्रँड फिनालेमध्ये सहभागी झाले होते. महेश भट्ट देखील बिग बाॅस ओटीटी 2 च्या मंचावर डान्स करताना दिसले. इतकेच नाही तर सलमान खान याने देखील त्याच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.

मुळात म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 प्रचंड चर्चेत होते. 50 दिवसांपेक्षाही अधिक काळ बिग बाॅस ओटीटी सुरू होते. मोठी भांडणे आणि वाद देखील बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये बघायला मिळाला. पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाल्यापासून तर विविध चर्चांनाच उधाण आले. टीव्हीतील अनेक मोठे चेहरे बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाले.

विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 ने एक अत्यंत मोठा इतिहास रचला आहे. चक्क वाईल्ड कार्ड आलेला एल्विश यादव हाच बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरलाय. बिग बाॅसच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांच झाल्याचे बघायला मिळाले. यापूर्वी कधीच वाईल्ड कार्ड बिग बाॅसच्या घरात आलेला स्पर्धेक विजेता झाला नव्हता.

सुरूवातीपासूनच अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यामध्ये मोठी चुरस ही बघायला मिळाली. एल्विश यादव याचे बिग बाॅसच्या घरात मोठे वाद होताना दिसले. एल्विश यादव हा सुरूवातीच्या काळात बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरातील सदस्यांच्या निशाण्यावर होता. अनेकांनी त्याला वाईल्ड कार्ड आल्याने टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.

एल्विश यादव हा हरियाणा येथील गुरूग्रामचा रहिवाशी आहे. एल्विश यादव हा एक यूट्यूबर आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव याने आपली जर्नी 2016 मध्ये सुरू केली. सोशल मीडियावर मोठा स्टार एल्विश यादव हा आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव याचे तब्बल तीन चॅनल देखील आहेत. ज्यामधून तो कोट्यावधीची कमाई करतो.

विशेष म्हणजे एल्विश यादव याला मिलियन्समध्ये लोक फाॅलो करतात. लाईव्ह व्लाॅगच्या माध्यमातून एल्विश यादव हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. इंस्टाग्रामवर एल्विश यादव याला तब्बल 13 मिलियनपेक्षाही अधिक लोक फाॅलो करतात. दर महिन्याला एल्विश यादव हा यूट्यूबवरून 8 ते 10 लाखांची कमाई करतो.

एल्विश यादव याला लग्झरी गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे. एल्विश यादव हा अत्यंत लग्झरी लाईफ जगतो. दिल्लीमध्येही एल्विश यादव याने मोठी जमीन घेतल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर त्याचे एक एनजीओ देखील आहे. कोट्यावधी संपत्तीचा मालक हा एल्विश यादव आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?