AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Ott Season 2 Winner LIVE | एल्विश यादव याने लिहिला मोठा इतिहास, पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड स्पर्धेक ठरला विजेता

नुकताच बिग बाॅस ओटीटी 2 विजेता मिळाला आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले अत्यंत खास पद्धतीने पार पडला. सलमान खान याने बिग बाॅस ओटीटी 2 होस्ट केले आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरातील सदस्यांनी धमाकेदार डान्स देखील केले आहेत.

Bigg Boss Ott Season 2 Winner LIVE | एल्विश यादव याने लिहिला मोठा इतिहास, पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड स्पर्धेक ठरला विजेता
| Updated on: Aug 15, 2023 | 12:29 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी 2’ने धमाल केलीये. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बिग बॉस ओटीटी 2 (Bigg Boss ott 2) ला सलमान खान याने होस्ट केले. अनेकदा सलमान खान (Salman Khan) हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेताना देखील दिसला. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सहभागी झाल्याने मोठी चर्चा रंगली. विशेष म्हणजे पूजा भट्ट चांगला गेम खेळताना बिग बाॅसच्या घरात दिसली. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी 2 तब्बल 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवस काळ चालले आहे. नुकताच आता बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले पार पडला आहे.

बिग बॉस ओटीटी 2 ला नुकताच विजेता मिळाला आहे. सलमान खान याने विजेत्याची घोषणा केलीये. विशेष म्हणजे यावेळी लाईव्ह मतदान देखील झाले. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान दोन स्पर्धेकांमध्ये मोठी चुरस ही बघायला मिळाली. शेवटी बिग बाॅसच्या विजेत्याची माळ एल्विश यादवच्या गळ्यात पडली. एल्विश यादव बिग बाॅस ओटीटीमध्ये जोरदार चर्चेत होता.

बिग बॉस ओटीटी 2 च्या विजेत्याला तब्बल 25 लाख रूपये मिळाले आहेत. फक्त 25 लाखच नाही तर विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुरूवातीपासून बिग बाॅसच्या विजेतेपदासाठी एल्विश यादव याच्या नावाची जोरदार चर्चा बघायला मिळत होती.

बिग बॉस ओटीटी 2 एल्विश यादव विजेता झाल्यापासून सोशल मीडियावर लोक एल्विश यादवला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एल्विश यादव याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये जबरदस्त गेम खेळताना एल्विश यादव दिसला. शेवटी एल्विश यादव हाच विजेता झाला आहे.

अनन्या पांडे आणि आयुष्यान खुराना हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅस ओटीटीच्या फिनालेमध्ये पोहचले होते. यावेळी घरातील स्पर्धेकांसोबत धमाल करताना अनन्या आणि आयुष्मान दिसले. सलमान खान हा देखील ग्रँड फिनालेमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसला. धमाकेदार डान्स घरातील सदस्यांनी देखील केली आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...