दुसरी पत्नी भडकली, अरमान आणि कृतिकावर नाराज पायल मलिक, म्हणाली, एकदाही…

बिग बॉस ओटीटी 3 हे चांगलेच धमाल करताना दिसत आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये दाखल झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पायल ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. आता अरमान आणि कृतिकावर पायल ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय.

दुसरी पत्नी भडकली, अरमान आणि कृतिकावर नाराज पायल मलिक, म्हणाली, एकदाही...
Payal Malik
| Updated on: Jul 21, 2024 | 11:47 AM

अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाला. मात्र, त्याची पहिली पत्नी पायल ही बिग बॉस ओटीटी 3 मधून बाहेर पडलीये. बिग बॉसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हे बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळत आहेत. दुसरीकडे पहिली पत्नी पायल ही सध्या घर आणि त्यांच्या मुलांना सांभाळताना दिसत आहे. चार लेकरांसोबत पायल व्लॉग शेअर करते. हेच नाहीतर बिग बॉसबद्दलचे अपडेटही शेअर करताना पायल मलिक ही दिसत आहे. आता नुकताच पायल मलिक ही भडकल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये बिग बॉसने नुकताच घरातील सदस्यांना व्लॉग बनवण्याचा एक टास्क दिला. अरमान आणि कृतिका मलिक यांनी व्लॉग तयार करत हा टास्क पूर्ण केला. मात्र, दोघांनीही हा व्लॉग करताना एकदाही पायलच्या नावाचा साधा उल्लेखही केली नाही. यामुळे आता पायल मलिक ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय.

पायल हिने व्लॉगमध्ये म्हटले की, सर्व लोक जे आहेत ते सर्व पॉझिटिव्ह होत आहेत. फक्त अरमान आणि कृतिका हेच व्लॉग करत आहेत. पण अरमान आणि कृतिका यांनी व्लॉगमध्ये एकदाही म्हटले नाही की, पायल आपल्यासोबत नाहीये ती पण असती. या गोष्टीचे मला खरोखरच खूप जास्त वाईट वाटले आहे. पायलच्या बोलण्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की, ती अरमान आणि कृतिकामुळे नाराज आहे.

हेच नाहीतर अरमान मलिक आणि कृतिका मलिक हे काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात रोमांटिक होताना देखील दिसले. मध्यंतरी लोकांचे बोलणे ऐकून पायल मलिक हिने थेट अरमान याच्यासोबत घटस्फोट घेण्यावरही भाष्य केले होते. मात्र, अरमान आणि कृतिका मलिक हे बिग बॉसमधून बाहेर आल्यावरच याबद्दल बोलणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.

कृतिका मलिक हिच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच विशाल पांडे याने बिग बॉसच्या घरात असताना अत्यंत चुकीची कमेंट केली. ज्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. हेच नाहीतर पायल मलिक हिने बिग बॉसच्या मंचावर येत थेट विशाल पांडे याची पोलखोल केली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा हा बघायला मिळाला.