AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विशाल पांडेसोबत बसल्याने दुसऱ्या पत्नीवर संतापला अरमान मलिक, म्हणाला, तुझे…

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा धमाका होताना दिसत आहे. विशाल पांडे याच्या कानाखाली अरमान मलिक याने लावली होती. हेच नाहीतर त्यानंतर बिग बॉसच्या घरात जोरदार धमाका होताना दिसला. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटीमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे एक नाव आहे.

विशाल पांडेसोबत बसल्याने दुसऱ्या पत्नीवर संतापला अरमान मलिक, म्हणाला, तुझे...
Kritika Malik and Armaan Malik
| Updated on: Jul 10, 2024 | 11:37 AM
Share

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक हा सर्वाधिक चर्चेत आहे. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल विशाल पांडे याने हैराण करणारे भाष्य केले. अत्यंत चुकीचे वाक्य विशाल हा कृतिकाबद्दल बोलला होता, याचा खुलासा पायल मलिक हिने बिग बॉसच्या मंचावर येत केला. त्यानंतर बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. हेच नाहीतर अरमान मलिक याने थेट विशाल पांडे याच्या कानाखाली जाळ काढला. बिग बॉसने आणि घरातील सदस्यांनी निर्णय घेत अरमान मलिक याला शोमध्ये असेपर्यंत नॉमिनेशनमध्ये टाकले आहे.

विशाल पांडे याने कृतिका मलिकबद्दल केलेल्या कमेंटनंतर घरातील सदस्यांनी विशालपासून एक अंतर ठेवले आहे. घरात काही ग्रुप बघायला मिळत आहेत. नुकताच आता कृतिका मलिक हिच्यावर चांगलाच भडकताना अरमान दिसत आहे. अरमानने कृतिकाला खडेबोल सुनावले आहेत. याचे कारणही विशाल पांडे हा असल्याचे दिसत आहे.

नॉमिनेशन टास्कच्या अगोदर कृतिका मलिक ही विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि शिवानी कुमारी यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसताना दिसत आहे. हे पाहून अरमान मलिक याचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. अरमान मलिक हा कृतिका हिला म्हणतो की, इकडे ये, तुझे डोळे अजून उघडले नाहीत का?

यावर कृतिका म्हणते की, माझे डोळे उघडले आहेत आता, लगेचच कृतिका ही तिथून उठून अरमान मलिक याच्या शेजारी जाऊन बसते. त्यानंतर अरमान मलिक म्हणतो की, मला अजूनही तू डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. तुझ्यासाठी एक चष्मा लेन्सचा बनवावा लागेल. कृतिका मलिक म्हणते, तिथे शिवानीच्या शेजारी जागा होती म्हणून मी जाऊन बसले. 

यानंतरही अरमान मलिक हा कृतिकाला खडेबोल सुनावताना दिसत आहे. मात्र, अरमान रागातच आहे, दुसरीकडे कृतिका ही अरमानला समजावत आहे. कृतिका, पायल आणि अरमान मलिक हे बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाले होते, मात्र पायल मलिक ही काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. आता सोशल मीडियावर सतत व्हिडीओ शेअर करताना पायल मलिक ही दिसत आहे. 

Follow Us
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...