जेव्हा ते एकत्र झोपायचे तेव्हा..; पतीची फसवणूक आठवून पायल मलिकला कोसळलं रडू

अरमानने पायल मलिकशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर तिचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर हे तिघं एकाच घरात एकत्र राहतात. आता बिग बॉसच्या घरात पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना पायलला अश्रू अनावर झाले.

जेव्हा ते एकत्र झोपायचे तेव्हा..; पतीची फसवणूक आठवून पायल मलिकला कोसळलं रडू
अरमान मलिक, पायल मलिक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 27, 2024 | 4:03 PM

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. यामागचं प्रमुख कारण म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्याने सर्वांत आधी पायलशी लग्न केलं होतं. त्यानंतर पायलचीच खास मैत्रीण कृतिकाशी त्याने दुसरं लग्न केलं. जेव्हा पायलला याविषयी समजलं होतं, त्यावेळी तिची काय भावना होती? मैत्रीण आणि पतीनेच फसवणूक केल्यानंतर तिने कोणता निर्णय घेतला, याविषयी ती बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसमोर मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी सवत आणि पतीबद्दल बोलताना पायलला अश्रू अनावर झाले. जियो सिनेमाच्या एक्स अकाऊंटवर ही क्लिप पोस्ट करण्यात आली असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

तुझ्यासोबत फसवणूक झाली असं तुला वाटत नाही का, असा प्रश्न विचारल्यावर पायल म्हणाली, “त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं. मी कोणाशी बोलू, हेच मला कळत नव्हतं. मला वाटलं की अरमान माझ्यासोबत मस्करी करतोय. मी म्हटलं ठीक आहे. त्यांना वाटलं की मी मंजुरी दिली. त्यावेळी मी काहीच बोलू शकली नाही. मी त्याचवेळी त्यांना थांबवलं पाहिजे होतं. तुम्ही वेडे झाले आहात का? असं विचारायला हवं होतं. मात्र मी व्यक्त होऊ शकली नाही आणि ते लग्न करून मोकळे झाले.”

या व्हिडीओमध्ये पायल पुढे सांगते की जेव्हा अरमान आणि कृतिका सप्तपदी घेत होते, तेव्हाच ती घर सोडून निघून गेली होती. ती तिच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती. “माझ्याच पतीचं दुसरं लग्न होताना पाहिलं गेलं नाही. पंधरा दिवस निघून गेल्यानंतर माझ्या डोक्यात हेच विचार घोळत होते की माझा पती दुसऱ्या महिलेसोबत झोपतोय. या गोष्टीच्या विचारानेच माझ्या मनात प्रचंड ईर्षा निर्माण झाली. त्याचवेळी बरीच भांडणंसुद्धा झाली होती. तेव्हा मुलगा चिकूला घेऊन मी काही दिवस वेगळी राहिली होती,” असं तिने पुढे सांगितलं. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले. तेव्हा अरमान तिच्याजवळ येऊन तिचं सांत्वन करतो.