खास मैत्रिणीचं पतीसोबत दुसरं लग्न; सवतबद्दल बोलताना पायलला अश्रू अनावर

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. कृतिका आणि पायल या अरमानच्या दोन पत्नी असून दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. लग्नानंतर हे तिघं आणि त्यांची मुलं एकत्र एकाच घरात राहतात.

खास मैत्रिणीचं पतीसोबत दुसरं लग्न; सवतबद्दल बोलताना पायलला अश्रू अनावर
पायल मलिक, अरमान मलिकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 11:51 AM

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी विशेष चर्चेत आहेत. अरमानने पायल मलिकशी पहिलं लग्न केलं. त्यानंतर तिचीच खास मैत्रीण कृतिकाशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर हे तिघं एकाच घरात एकत्र राहतात. आता बिग बॉसच्या घरात पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना पायलला अश्रू अनावर झाले. अरमान आणि कृतिकाचं लग्न कशाप्रकारे झालं, याविषयी ती सांगत होती. यावेळी अरमान आणि कृतिकासुद्धा तिच्यासमोरच बसले होते.

पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी पायल म्हणाली, “एके दिवशी मी बाहेर गेली होती आणि हे दोघं (कृतिका आणि अरमान) कुठेतरी सोबत बाहेर गेले होते. अरमानने तिला विचारलं असेल की लग्न करुयात आणि तिनेही त्याला होकार दिला. हे दोघं लग्न करून आले. मला एक फोन आला, अरे पायल तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मला अरमानची प्रत्येक गोष्ट समजते. मी लगेच विचारलं की, तुम्ही लग्न केलंत का?” पायल बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांना हे सांगत असते. त्यावेळी अरमान आणि कृतिका एकाच सोफ्यावर तिथे बसलेले असतात.

हे सुद्धा वाचा

अरमानच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ऐकल्यानंतर मुनिषा खटवानी पायलला विचारते, “तुला असं वाटत नाही का, तुझ्या चांगल्या मैत्रिणीने तुझ्याच पतीशी लग्न करून तुझी फसवणूक केली?” हे ऐकून पायलला अश्रू अनावर होतात आणि काही उत्तर देण्याआधीच ती रडू लागते. तेव्हा अरमान लगेच तिचं सांत्वन करायला जागेवरून उठतो. त्याचवेळी कृतिका म्हणते, “जेव्हा पण ती ही गोष्ट सांगते, तेव्हा ती नेहमी भावूक होते.” इतर स्पर्धकसुद्धा पायलजवळ येऊन तिचं सांत्वन करतात. नंतर अरमान पायलला विचारतो, “आता तरी खुश आहेस ना? ओय, खुश आहेस ना? आता तर मला असं वाटतं की या दोघांचं लग्न झालंय आणि मी असाच यांच्यामध्ये आहे.”

बिग बॉसच्या घरात अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर टीका केली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिनेसुद्धा सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित बिग बॉस आणि अरमान मलिकवर निशाणा साधला. बहुपत्नीत्वला प्रोत्साहन देऊन काय मिळतंय, असा सवाल तिने केला होता.

'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.