फक्त ठरकी पुरुषच…; अरमान मलिकला प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावलं

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभाग घेतला. यावरून नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याला दोन लग्नांवरून ट्रोलसुद्धा केलंय. आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने अरमानवर संताप व्यक्त केला.

फक्त ठरकी पुरुषच...; अरमान मलिकला प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावलं
युट्यूबर अरमान मलिक, पायल आणि कृतिका मलिकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 11:06 PM

बिग बॉस ओटीटीचं तिसरं सिझन सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिझनमध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकनेही त्याच्या दोन्ही पत्नींसोबत स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. अरमानने पायल आणि कृतिका मलिक यांच्याशी लग्न केलंय. आता बिग बॉसच्या घरातही तो दोन्ही पत्नींसोबत राहत असल्याने सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे अरमानला दोन लग्नावरून ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे बिग बॉसवर बहुपत्नीत्वचा प्रसार केल्याप्रकरणी टीका केली जातेय. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीन भट्टाचार्जीने पुन्हा एकदा अरमान आणि बिग बॉसवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

देवोलीनाने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अरमान मलिकची एक क्लिप शेअर करत लिहिलं, ‘मी प्रत्येक पुरुषाबद्दल तर बोलू शकत नाही, पण निश्चितपणे ठरकी विचार असणारे पुरुषच दोन, तीन किंवा चार पत्नी ठेवायचा विचार करत असतील. कृपा करून हा घाणेरडापणा बंद करा. देवाखातर तरी याला बंद करा. जर एकेदिवशी पत्नी म्हणू लागल्या की त्यांनासुद्धा एकापेक्षा अधिक पती हवे आहेत, तेव्हा पाहू कितीजण हा शो एंजॉय करतील. तो दिवसही फार लांब नाही. जे लोक आज बोलत आहेत की हे त्याचं आयुष्य आहे, तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत खुश असेल तर तुम्हाला काय समस्या आहे, त्यांना मला त्यादिवशी पहायचं आहे. काळजी करू नका, कर्माचं चक्र अशाच पद्धतीने चालतं.’

हे सुद्धा वाचा

‘एक दिवशी नक्कीच एखादी मुलगी म्हणेल की तिला दोन मुलांसोबत लग्न करायचं आहे आणि ती दोघांना खुश ठेवेल. तेव्हा किती लोक त्या मुलीची साथ देतील, ते मला पहायचंय. तेव्हा हेच सर्वजण सर्वांत आधी त्या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतील. एक समाज म्हणून आपण विनाशाच्या दिशेने जातोय. एखादी व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून एक चूक करत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपण तीच चूक पुढेसुद्धा केली पाहिजे. माझ्या दृष्टीकोनातून हे चुकीचं आहे आणि एकापेक्षा अधिक लग्न करणं पूर्णपणे चुकीचं आहे. हे भविष्यातही चुकीचंच असेल. मात्र आपण तरी काय करू शकतो? जोपर्यंत काहीजण स्वत: ते गोष्ट भोगणार नाहीत, तोपर्यंत त्यांना समजणार नाही. त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट’, अशा शब्दांत तिने सुनावलं आहे.

बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.