AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसच्या घरात मोठा वाद, थेट अंगावर फेकले पाणी, अभिनेत्री म्हणाली, थुंकते आणि…

Bigg Boss Season 18 : बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. सलमान खान या सीजनला होस्ट करताना दिसतोय. मुळात म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली.

बिग बॉसच्या घरात मोठा वाद, थेट अंगावर फेकले पाणी, अभिनेत्री म्हणाली, थुंकते आणि...
Avinash Mishra
| Updated on: Oct 23, 2024 | 12:38 PM
Share

बिग बॉस सीजन 18 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. सलमान खान हाच या सीजनला होस्ट करताना दिसतोय. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आणि एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी सलमान खान बिग बॉस 18 चेच शूटिंग करत होता. सलमान खानला जसे ही बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे कळाले तसे त्याने लीलावती रूग्णालय गाठले. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान खूप चांगलेच मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खानला मोठा धक्का बसला. हेच नाही तर सलमान खानला देखील सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान याने मोठ्या सुरक्षेत बिग बॉस 18 ची विकेंडचा वार नुकताच होस्ट केलाय.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. हेच नाही तर आता सलमान खान सुरक्षेच्या कारणामुळे बिग बॉसला होस्ट करताना दिसणार नसल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर सलमानने विकेंडचा वार होस्ट केलाय. बिग बॉसच्या घरात जोरदार राडा होताना दिसतोय. मोठा वाद बिग बॉस सीजन 18 मध्ये झाल्याचे नुकताच बघायला मिळाले.

अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे हे दोघे सुरूवातीपासूनच चांगले चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता नुकताच एक प्रोमो बिग बॉसचा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे यांच्यात जोरदार वाद होताना दिसतोय. हेच नाही तर दोघांमधील भांडणे वाढल्याचे बघायला मिळतंय. 

जेलची शिक्षा अविनाश मिश्रा याला देण्यात आलीये. जेलमध्ये अविनाश मिश्रा हा झोपलेला असताना चाहत ही त्याच्या अंगावर पाणी फेकते. यानंतर अविनाश मिश्रा हा उठतो. यानंतर अविनाश हा म्हणतो की, मला माहित आहे की चाहतच्या हृदयात कुठेतरी माझ्यासाठी खूप प्रेम आहे. म्हणूनच तिला मला ओल्या केसांमध्ये पाहायचे आहे. तिला माझे भिजलेले शरीर बघायचे असल्यानेच तिने माझ्या अंगावर पाणी फेकले.

अविनाशचे हे बोलणे ऐकून चाहत चांगलीच संतापताना दिसलीये. चाहत ही अविनाशला थेट म्हणते की, माझ्या पायातील चप्पल देखील तुझ्यावर प्रेम करणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करते असे तू नॅशनल टीव्हीवर सांगून एका मुलीची इज्जत काढत आहेस. मी तुझ्यासारख्या आणि तुझ्यासारखे विचार असलेल्या मुलांवर थुंकते, असेही तिने म्हटले. आता त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

Follow Us
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष
शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ, छत्रपती संभाजीनगर...
ShivSena | शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का! कागदपत्रांचा घोळ अन् छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली, काय घडतंय?
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली