
Bipasha Basu : आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी ब्रेस्टफीडिंग करताना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ब्रेस्टफीडिंग करताना फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अभिनेत्रींनी ट्रोलींगचा सामना देखील करावा लागला, तर काहींनी मात्र अभिनेत्रींचं कौतुक केलं. आता अभिनेत्री बिपाशा बासू हिने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर ब्रेस्टफीडिंग करताना एक सेल्फी पोस्ट केला. सेल्फी पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री तुफान चर्चेत आली. मुलगी देवी हिला स्तनपान करताना सेल्फी पोस्ट करत स्तनपानाचं महत्त्व सांगितलं.
बिपाशाने लेकीला स्तनपान करताना एक सेल्फी पोस्ट केला आहे. सेल्फीमध्ये मातृत्वामुळे आलेली चमक अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर प्रिंसेसच्या ड्रेसमध्ये देवी गोंडस दिसत आहे. पण देवीचा चेहरा अभिनेत्रीने इमोजीमध्ये लपवला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘माझं हृदय देवीसोबत माझी सकाळ…’ सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिपाशा कायम देवी सोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अद्याप अभिनेत्री लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. बिपाशाने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेता करण ग्रोवर आणि बिपाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना देखील अभिनेत्रीने लेकीसोबत क्यूट फोटो शेअर केला. सध्या अभिनेत्री मातृत्वाचा आनंद घेत आहे. एककाळ बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींपैकी एक असणारी बिपाशा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेनयापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांसोबत संवाद साधत असते.
बिपाशा आणि करण यांचं लग्न
बिपाशा आणि करण यांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. २०१५ साली सिनेमाच्या सेटवर भेट झाल्यानंतर कालांतराने त्यांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर जवळपास ६ वर्षांनंतर दोघे आई-बाबा झाले.
बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला नाव देण्याचा निर्णय घेतला. आता जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपं पालक बनणार आहे.