कंगना राणौतने खरंच उरकलं गुपचूप लग्न! अखेर म्हणाल्याच, ‘एका विवाहित महिलेचा लूक…’
अभिनेत्री कंगना राणौत यांनी खरंच उरकलं आहे का वयाच्या 40 व्या वर्षी गुपचूप लग्न, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र…, अखेर म्हणाल्याच, 'एका विवाहित महिलेचा लूक...', सध्या सर्वत्र कंगना यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Kangana Ranaut : हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र… पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. अनेकांना कंगना यांच्या व्हिडीओवर कमेंट करत खरंच लग्न झालं आहे का? असा प्रश्न देखील विचारला. एवढंच नाही तर, नवरा मुलगा कोण आहे? कधी लग्न झालं? कुठे लग्न झालं? असे अनेक प्रश्न विचारले. आता यावर खुद्द कंगना राणौत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एक पोस्ट करत कंगना यांनी नक्की सत्य आहे? याबद्दल सांगितलं आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत कंगना यांनी लग्न झालं नसल्याचं सांगितलं आहे. कंगना राणौत म्हणाल्या, ‘प्रत्येक दिवशी मी शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात शुटिंग करत असते आणि कोणीतरी माझा असा व्हिडीओ काढला… ज्यामध्ये मी माझ्या भूमिकेत होते. आता मला सतत फोन येत आहेत. पण एका विवाहिक महिलेच्या लूकवरून एवढी चर्चा का होत आहे? कलाकार प्रत्येक प्रकारच्या भूमिका बजावतात आणि मी वचन देते की, मी गुपचूप लग्न कधीच करणार नाही…’ असं देखील कंगना म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये कंगना रणौत घरातून बाहेर पडून आपल्या गाडीकडे जाताना दिसल्या. फिकट गुलाबी रंगाचा सूट आणि कपाळावर टिकली लावलेल्या कंगना यांना पापाराझींनी पाहिलं, पण कंगना त्यांच्याशी न बोलता शांतपणे निघून गेल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
एका नेटकऱ्याने कमेंट करत विचारलं, ‘मंगळसूत्र? कंगना हिचं लग्न झालं का?’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘व्हिडीओ कदाचित सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे…’, तर काही नेटकरी असं देखील म्हणत आहेत की, कंगना यांनी गुपचूप लग्न उरकलं आहे… पण समोर येत असलेल्या माहितीनुसार, कंगना यांनी लग्न केलं नसून, आगामी ‘तनू वेड्स मनू 3’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा व्हिडीओ आहे. लवकरच कंगना आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.
सर्वात महत्त्वाच म्हणजे, राजकारणात दमदार एन्ट्री केल्यानंतर कंगना यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं आहे. कंगना यांनी 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला.
कंगना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कंगना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नेटकरी देखील त्यांच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.