Kangana Ranaut: 13 कोटींच्या कारमधून मैथिली ठाकूर लालबागच्या राजाच्या दर्शनाला येताच ट्रोल, खासदार कंगना राणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

Kangana Ranaut: 13 कोटींच्या कारमधून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या मैथिली ठाकूर हिला ट्रोल करण्यात आलं आहे. यावर खासदार कंगना राणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर

Kangana Ranaut:  13 कोटींच्या कारमधून मैथिली ठाकूर लालबागच्या राजाच्या दर्शनाला येताच ट्रोल, खासदार कंगना राणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर
Actress Kangana Ranaut
| Updated on: Sep 21, 2026 | 11:41 AM

Kangana Ranaut: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना 26 वर्षीय खसदाराचं समर्थन केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सांगायचं झालं तर, भोजपुरी गायिका आणि खासदार मैथिली ठाकूर मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या. तेव्हा मैथिली ठाकून तब्बल 13 कोटींच्या रॉल्स रॉयल या आलिशान कारमधून बाहेर पडल्या. अशात मैथिली ठाकूर यांना महागड्या कारमधून उतरताना पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. अशात कंगना राणौत यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कंगना राणौत यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ‘नेत्यांचं चांगलं आयुष्य पाहिल्यानंतर काही लोकांचा जळफळाट होतो. आता आमच्या एका तरुण खासदाराला ट्रोल केलं जात आहे. कारण खासदार आलिशान आयुष्य जगत आहे. भले आम्ही समाजाच्या सेवेसाठी काम करत आहोत. प आमचं देखील करीयर आणि लोकप्रियता आहे…’

‘आम्ही चांगलं आयुष्य जगू शकत नाही का?’

पुढे पोस्टमध्ये कंगना म्हणतात, ‘आम्ही निस्वार्थ मनाने काम करत आहोत. पण असं असताना देखील आमचं आलिशान आणि चांगलं आयुष्य लोकांना का खटकत आहे? आम्ही चांगलं आयुष्य जगू शकत नाही का? आम्हाला लोकांच्या संपत्तीत कासलाच रस नाही. पण आम्ही कायम गरिबांसारखं जगलं पाहिजे, हे पूर्णपणे वाईट आहे…’ असं देखील कंगना म्हणाल्या.

त्रिषा कृष्णन हिचं देखील कंगना यांनी केलं समर्थन

ही पहिली वेळ नाही जेव्हा कंगना यांनी कुणाचं समर्थन केलं आहे. याआधी कंगना यांनी अभिनेत्री तृषा कृष्णन हिचं समर्थन केलं होतं. पण त्रिषाचं नाव न घेता सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले, “तमिळनाडूमध्ये काय घडलं हे तुम्ही पाहिलंच असेल; तिथे दोन पक्षांमधील संबंधांशी संबंधित एका प्रकरणात एक अत्यंत प्रसिद्ध कलाकार आणि अभिनेत्री गुंतलेली होती. मात्र, जेव्हा शाब्दिक गैरवर्तन आणि चारित्र्यहननाचा प्रश्न येतो, तेव्हा नेहमीच महिलेला लक्ष्य केलं जातं.”, असं कंगना म्हणालेल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us