शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर अचनाक का पोहोचली BMC? काय आहे संपूर्ण प्रकरण

Shah Rukh Khan Mannat Renovation: अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याच्या नुतनीकरणाचं काम सुरु आहे. अशात बंगल्यात अचानक BMC पोहोचली? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर अचनाक का पोहोचली BMC? काय आहे संपूर्ण प्रकरण
| Updated on: Jun 21, 2025 | 1:35 PM

Shah Rukh Khan Mannat Renovation: अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता वादग्रस्त प्रकरणात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानच्या मन्नत बंगल्याच्या नुतनीकरणाचं काम सुरु आहे. अशात अचानक शाहरुखच्या बंगल्यावर BMC चे कर्मचारी पोहोचले. बंगल्याच्या नूतनीकरणादरम्यान सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार बीएमसीला मिळाली आहे. त्यामुळे बीएमसी बंगल्याच्या चौकशीसाठी आली.

मुंबईतील वांद्रे परिसरात समुद्रकिनाऱ्यावर शाहरुख खानचा बंगला मन्नत आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) च्या नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मिळाल्यावर, बीएमसीच्या पथकाने 20 जून रोजी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची तपासणी केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) च्या नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही याची चौकशी आता बीएमसी करत आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मन्नतबाबत ही तक्रार केली होती, त्यानंतर बीएमसीची टीम आली.

सांगायचं झालं तर, शाहरुख खानचा बंगला मन्नत हा ग्रेड III हेरीटेज स्ट्रक्चर्सपैकी एक आहे. म्हणूनच बंगल्यात कोणत्याही प्रकारचा संरचनात्मक बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पूर्वीच एनजीटीला पत्र लिहून आरोप केला होता की शाहरुख खानने मन्नत येथील नूतनीकरणासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन परवानगीचं उल्लंघन केलं आहे. त्यानंतर एनजीटीने संतोष दौंडकर यांना शाहरुख खानवर लावलेल्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मन्नतच्या नुतनीकरणासाठी लागू शकतो 1 वर्षाचा कालावधी

मन्नतच्या नूतनीकरणामुळे, शाहरुख खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह वांद्रे येथील जवळच्या इमारतीत भाड्याने राहत आहे. रिपोर्टनुसार, नूतनीकरणाद्वारे मन्नतमध्ये 2 नवीन मजले वाढवले जात आहेत. घराचे आतील भाग, फर्निचर आणि अगदी लाईटिंग देखील बदलले जात आहे. अशा परिस्थितीत, मन्नतचे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे एक वर्ष लागू शकते.