प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत ब्रेकअप, बॉबी देओले तान्यासोबत थाटला संसार कारण.., काय आहे पडद्यामागचं सत्य…
अभिनेता बॉबी देओल याची पत्नी झगमगत्या विश्वापासून दूर असते. पण दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे फार कमी लोकांना माहिती आहे... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉबी याने तान्यासोबत लग्न केलं.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण ही ओळख भक्कम करण्यासाठी अभिनेत्याला मोठा खस्ता खावा लागला आहे. ‘बरसात’ सिनेमातून अभिनेत्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सुरुवातीला बॉबीने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण त्यानंतर अभिनेच्य करियरचा ग्राफ खाली उतरत गेला. बॉबी देओल याच्या फक्त प्रोफेशनल आयुष्यात संकट आलं नाही तर, अभिनेत्यच्या खासगी आयुष्यात देखील मोठे चढ – उतार निर्माण झाले.
एक काळ असा होता जेव्हा बॉबी देओल बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निलम कोठारी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. निलम आणि बॉबी यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही. रिपोर्टनुसार, बॉबी याला निलम हिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण दोघांच्या नात्याला अभिनेते धर्मेंद्र यांचा विरोध होता.
इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मुलगी देओल कुटुंबाची सून होऊ शकत नाही… असं धर्मेंद्र यांचं म्हणणं होतं. याच कारणामुळे बॉबी आणि निलम यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बॉबी याने तान्य हिच्यासोबत लग्न केलं.
नीलम हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉबी याच्या आयुष्यात तान्या हिची एन्ट्री झाली. दोघांची पहिली ओळख मुंबईत एका हॉटेलमध्ये झालेली. पहिल्याच ओळखीत बॉबी, तान्या हिच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि कालांतराने ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. 30 मे 1996 मध्ये बॉबी आणि तान्या यांनी लग्न केलं. तान्याचे वडील देवेंद्र अहुजा उद्योजक आहेत.
बॉबी देओलची पत्नी, तान्या आहुजा, एक कॉस्च्युम डिझायनर आणि व्यावसायिक आहे. बॉबी देओलशी लग्न केल्यानंतर ती पडद्यापासून दूर राहिली असली तरी, कॉस्च्युम डिझायनिंगच्या माध्यमातून ती चित्रपटसृष्टीशी जोडलेली राहिली. तिने अनेक सिनेमांमध्येमध्ये काम केले आहे. तान्या हिने ‘सेकेंड हैंड हस्बैंड’, ‘मिलो ना तुम’, ‘ड्राइविंग मी क्रेजी’ यांसारख्या सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझाईन केले आहेत.