45 Years Of Khoon Pasina : मांडीवर वाघ अन् मनात आठवणींचा खजिना, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 45 वर्ष जुना फोटो

अमिताभ बच्चन यांनी 45 वर्ष जुना एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात अमिताभ यांच्या मांडीवर वाघ बघायला मिळतोय. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी 'खून पसीना' (khoon pasina) चित्रपटाला 45 वर्षे पूर्ण झाल्याचंही सांगितलं आहे.

45 Years Of Khoon Pasina : मांडीवर वाघ अन् मनात आठवणींचा खजिना, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 45 वर्ष जुना फोटो
अमिताभ बच्चन
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 3:35 PM

मुंबई : बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहेत. सध्या सोशल मीडिया लोकांपर्यंत पोहोचण्याचं चांगलं माध्यम आहे. त्यामुळे अमिताभ बच्चनदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आज अमिताभ बच्चन यांनी 45 वर्ष जुना एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात अमिताभ यांच्या मांडीवर वाघ बघायला मिळतोय. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी ‘खून पसीना’ (khoon pasina) चित्रपटाला 45 वर्षे पूर्ण झाल्याचंही सांगितलं आहे.

अमिताभ यांची इन्स्टाग्राम पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी आज इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो 45 वर्ष जुना असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. यात अमिताभ यांच्या मांडीवर वाघ बघायला मिळतोय. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी ‘खून पसीना’ चित्रपटाला 45 वर्षे पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलंय,’खून पसीना’ चित्रपटासाठी मी जिवंत वाघाशी लढलो. या चित्रपटाला आज 45 वर्षे झाली. या चित्रपटाचा चांदिवली स्टुडिओ मुंबईत होता. या काळात आम्ही अभिषेकच्या जन्माच्या बातमीची आम्ही वाट बघत होतो, असं अमिताभ बच्चन आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

बिग बी नेहमी आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी ते आपले पिता हरिवंशराय बच्चन यांच्या कविता सादर करताना दिसतात तर कधी ते आपले काही फोटो शेअर करताना दिसतात. असाच त्यांनी आज हा शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.

बिग बींचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ते अजय देवगणसोबतच्या ‘मे डे’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच रणबीर कपूर आणि आलिया भट्टयांच्यासोबत ते ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. याशिवाय ‘झुंड’ सिनेमातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.

संबंधित बातम्या

प्रियंकाचं मूल प्री मॅच्युअर! रुग्णालयात उपचार सुरु, नेमकी प्रियंकाची डिलीव्हरी लवकर का झाली ?

Mayara Vaikul Birthday :’क्युट गर्ल’ मायराचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस

लतादीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; निर्मात्या अनुषा श्रीनिवासन यांचं आवाहन