
बॉलिवूड अभिनेते तरुण दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. नुकताच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने चक्क स्वत:ची लघवी प्यायल्याचे समोर आले आहे. तसेच हा सल्ला एका दिग्गज व्यक्तीने दिल्याचे देखील सांगितले.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून परेश रावल आहे. त्यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते 'घातक' चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात राकेश पांडे होते. परेश रावल यांचा एक सीन होता ज्यात त्यांना राकेश पांडे यांना ओढायचे होते. असे करताना ते गुडघ्यांवर पडले आणि त्यांना दुखापत झाली.

त्यामुळे परेश रावल यांना वाटू लागले की त्यांचे करिअर संपले. त्या वेळी परेश रावल यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच रुग्णालयात अजय देवगन यांचे वडील वीरू देवगन कोणाला तरी भेटण्यासाठी आले होते.

जेव्हा वीरू देवगन यांना कळले की परेश रावल इथे दाखल आहेत, तेव्हा ते भेटायला गेले. परेश यांच्या मते, त्यानंतर अजय यांच्या वडिलांनी त्यांना असा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांचा मोडलेला पाय लवकर बरा झाला.

वीरू देवगन यांनी त्यांना विचारले की, मी जे सांगेन ते करशील का? यावर परेश रावल यांनी होय असे उत्तर दिले. वीरू देवगन यांनी त्यांना सांगितले की, दररोज सकाळी उठून पहिले मूत्र प्यावे. वीरू देवगन यांनी हेही सांगितले की, सर्व फायटर्स असे करतात. असे केल्याने कधीही काही त्रास होणार नाही.

परेश रावल यांनी सांगितले की, त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वीरू देवगन यांनी सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी 15 दिवस असे केले आणि ते बरे झाले. त्यांचा एक्स-रे काढला गेला, जो पाहून डॉक्टर थक्क झाले की पाय इतक्या लवकर कसा बरा झाला. डॉक्टरांनी परेश रावल यांना विचारले की, हे कसे झाले.

परेश रावल यांनी मुलाखतीत हेही सांगितले की, उपचारासाठी त्यांना दोन- अडीच महिने लागणार होते. म्हणजेच तोपर्यंत ते पूर्णपणे काम करू शकले नसते. पण वीरू देवगन यांच्या सल्ल्यामुळे त्यांचा पाय लवकर बरा झाला आणि ते दीड महिन्यात कामाला लागले.