रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी आहे गोविंदाची प्रकृती? मुलाने दिली मोठी अपडेट

Govinda Health Update: पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाला रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल, आता कशी आहे अभिनेत्याची प्रकृती? मुलाने दिली मोठी माहिती..., चाहत्यांनी देखील व्यक्त केली होती चिंता...

रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी आहे गोविंदाची प्रकृती? मुलाने दिली मोठी अपडेट
| Updated on: Oct 30, 2024 | 12:54 PM

Govinda Health Update: मिसफायर झाल्याने गुडघ्याला गोळी लागून अभिनेता गोविंदा जखमी झाला होता. त्याच्यावर अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयाच उपचार सुरू होते. त्याच्या तब्येतीसंदर्भात अपडेट्स समोर आले आहेत. अभिनेत्याच्या मुलाने वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदा घरी आराम करत आहे. नुकताच, यशवर्धन याने चाहत्यांनी वडिलांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.

सांगायचं झालं तर, गोविंदाचा मुलगा यशवर्धन याला दिवाळी पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं. तेव्हा पापाराझींना यशवर्धनला वडिलांच्या प्रकृतीबद्दल विचारण्यात आलं. यावर यशवर्धन म्हणाला, ‘आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. टाके काढण्यात आलं आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. दोन आठवड्यांमध्ये आता डान्स करायला देखील सुरुवात करतील…’ असं यशवर्धन म्हणाला.

 

 

काही महिन्यांपूर्वी गोविंदा यांनी स्वतःच्या रिव्हाल्वरने चुकून स्वतःला गोळी मारून घेतली होती. बंदूक साफ करत असताना गोळी लागली… अशी काही त्यानंतर समोर आली. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ.रमेश अग्रवाल, गोविंदावर उपचार करत होती. गोविंदाला 8 ते 10 टाके पडल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली होती. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.

 

 

संबंधित घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि आणि याप्रकरणाची चौकशी सुरू केली. गोविंदाला गोळी लागल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटी देखील त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. सोशल मीडियावर देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

गोविंदाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून ते बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर गोविंदाने राज्य केलं. गोविंदाने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये 150 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘कुली नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘स्वर्ग’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’, ‘पार्टनर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये त्याने काम केलंय.