बहिणीचे प्री वेडिंग फंक्शन सोडून गोविंदाची लेक पोहचली ‘या’ ठिकाणी, आरती सिंहवर मामा अजूनही नाराज?

बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आरती सिंह हिचे नुकताच प्री वेडिंग झाले असून उद्या म्हणजे 25 एप्रिलला आरतीचे लग्न आहे. आरतीच्या प्री वेडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये धमाकेदार पद्धतीने डान्स करताना आरती सिंह दिसलीये.

बहिणीचे प्री वेडिंग फंक्शन सोडून गोविंदाची लेक पोहचली 'या' ठिकाणी, आरती सिंहवर मामा अजूनही नाराज?
Govinda
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 5:05 PM

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिचे लग्न 25 एप्रिलला आहे. नुकताच आरती सिंहचे संगीत आणि मेहंदी पार पडली. या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आरती सिंह ही बाॅलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आहे तर काॅमेडियन कृष्णाची बहीण आहे. आरती सिंह ही दीपक चौहान याच्यासोबत लग्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा आणि गोविंदा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. यामुळे आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी गोविंदाच्या कुटुंबामधून कोणीही पोहचले नाहीये.

दुसरीकडे कृष्णाची पत्नी कश्मीरा हिने म्हटले आहे की, मामा गोविंदा आणि आमचा वाद आहे. त्यामध्ये आरतीचे काहीच नाहीये. आरतीवर नाराज न राहता, त्यांनी लग्नाला यावे. प्रत्येक कुटुंबामध्ये वाद असतो. त्यांनी आरतीच्या लग्नाला येऊन तिला आर्शिवाद द्यावेत. आरतीची खूप इच्छा आहे की, त्यांनी लग्नाला यावे.

हे सर्व सुरू असतानाच गोविंदा याची मुलगी टीना आहूजा ही आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनला न जाता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहचली आहे. याची स्टोरी टीना आहूजा हिने सोशल मीडियावर शेअर देखील केलीये. बहीण आरतीच्या प्री वेडिंग फंक्शनला न जाता टीना मंदिरात गेल्याने लोकांना फार ते पचले नाहीये. यांच्यातील वाद मिटला नसल्याचे दिसतंय.

हेच नाही तर गोविंदा आणि त्याच्या पत्नीने एका मुलाखतीमध्ये थेट मान्य केले होते की, त्याचे आणि कृष्णाचे वाद सुरू आहेत. थेट मुलाखतीमध्येही कृष्णावर टीका करताना गोविंदा दिसला होता. मात्र, वाद नेमके कोणत्या कारणामुळे झाले, हे सांगणे टाळताना गोविंदा दिसला होता. गोविंदाने कृष्णा आणि आरतीचा लहानपणीचा सर्व खर्च उचलल्याचे देखील सांगितले जाते.

आता आरतीच्या लग्नाला तरी सर्व विसरून गोविंदा हा आपल्या कुटुंबासोबत येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. एक मुलाखत कृष्णा आणि आरती यांनी दिली होती. या मुलाखतीमध्ये लहानपणी मामा आपल्याला किती रूपये द्यायचे हे सांगताना कृष्णा दिसला होता. त्यावरूनच हा वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जाते. गेल्या काही वर्षांपासून कृष्णा आणि गोविंदा हे अजिबातच ऐकमेकांना बोलत नाहीत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.