IPL 2024, MI vs SRH : मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या दृष्टीने तसा काही महत्त्वाचा नाही. पण हैदराबादचं गणित या सामन्यानंतर बिघडू शकतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला वचपा काढण्याची संधी आहे.

IPL 2024, MI vs SRH : मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 10:16 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 55व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. तर मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं असून फक्त औपचारिकता उरली आहे. त्यामुळे हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेत. या आधीच्या सामन्यात हैदराबादने धावांचा डोंगर रचत सर्वच विक्रम मोडीत काढले होते. तसेच मुंबई इंडियन्सला विजय ट्रॅकवरून दूर फेकून दिलं होतं. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. सनरायझर्स हैदराबादने 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवून 12 गुण कमावले आहेत. आता उर्वरित चारपैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. पण मुंबई इंडियन्सने पराभूत केल्यास संघावरील दडपण वाढेल यात शंका नाही. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होणार आहे.

मुंबई इंडियन्सकडून पाच, तर सनरायझर्स हैदराबादकडून सहा खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेन, ट्रेव्हिस हेड, नितीश रेड्डी, टी नटराजन, पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. तर मुंबई इंडियन्सच्या टिम डेव्हिट, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

मुंबईतील वातावरणात आर्द्रता आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रहरात दव पडतं. तसेच दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं खूपच कठीण जातं. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर गोलंदाजीला प्राधान्य दिलं जातं. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर धावांचा डोंगर रचला जाईल यात शंका नाही. फिरकीपटूंना या खेळपट्टीवर टर्न मिळेल. तसेच वेगवान गोलंदाजांना बऱ्यापैकी उसळी मिळेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, मोहम्मद नबी, पियुष चावला, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्केंडे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.