25 वर्षांपासून अभिनेता बेपत्ता, रुग्णालयातून काढलेला पळ, पण लेकीचा ग्लॅमर पाहून म्हणाल…

Bollywood Actor : गेल्या 25 वर्षांपासून बाप कुठेय काहीही माहिती नाही, मानसिक रुग्णालयातून अभिनेत्याने काढलेला पळ, पण लेकीचा ग्लॅमर पाहून अनेक जण म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या लेकीची चर्चा...

25 वर्षांपासून अभिनेता बेपत्ता, रुग्णालयातून काढलेला पळ, पण लेकीचा ग्लॅमर पाहून म्हणाल...
फाईल फोटो
| Updated on: Jul 26, 2025 | 9:36 AM

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये कायम अशा गोष्टी घडत असतात, ज्या समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसतो. सध्या एका अभिनेत्याच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण अभिनेता मात्र गेल्या 25 वर्षांपासून गायब आहे. त्याच्या शोध घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. पण अभिनेत्याचा पत्ता काही लागला नाही. अभिनेत्याच्या लेकीचंन नाव ऋषिका महतानी असं आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा सुरु आहे, त्या अभिनेत्याचं नाव राज किरण असं आहे. राज याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजाबत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेता अचानक गायब झाला आणि चाहत्यांसोबत कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला.

असं म्हणतात की, अभिनेत्याचे सिनेमे फ्लॉप होत होते. ज्यामुळे अभिनेता डिप्रेशनमध्ये गेला. अखेर, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, त्याला मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, तो अचानक तिथून गायब झाला आणि 25 वर्षांहून अधिक काळ बेपत्ता आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे तो अमेरिकेतील एका मानसिक रुग्णालयात दाखल आहे.

अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षे मुंबईतील भायखळा मेंटल हॉस्पिटलमध्ये घालवली, परंतु त्यानंतर तो अचानक तिथून गायब झाला. काही रिपोर्टुनुसार, अभिनेता न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवताना दिसला होता. दीप्ती नवल म्हणाली होती की, कोणीतरी त्याला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून पाहिलं होतं. परंतु तिलाही पूर्णपणे खात्री नव्हती. 1999 पासून राज किरण कुठे आहे याबद्दल कोणाकडेही विश्वसनीय माहिती नाही. त्याचं बेपत्ता होणं हे अजूनही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानलं जातं.

काय करते ऋषिका?

ऋषिकाने अद्याप वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सोश मीडियावर ऋषिका कायम सक्रिय असते. ऋषिका महतानी ही एक यशस्वी उद्योजिका आहे आणि ऋषिफाईन नावाच्या प्रीमियम ज्वेलरी ब्रँडची संस्थापक आणि संचालक आहे. तिचा ग्लॅमर आणि व्यावसायिक जाण सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येते. ऋषिका सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.