AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagdeep Dhankhar आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन, 27 वर्ष जुनी हाय प्रोफाईल केस, जाणून व्हाल हैराण

Jagdeep Dhankhar - Salman Khan: जगदीप धनखड यांच्यामुळे सलमान खानला मिळेला मोठा दिलासा, 27 वर्ष जुनी हाय प्रोफाईल केसबद्दल जाणून व्हाल हैराण...

Jagdeep Dhankhar आणि सलमान खान यांचं खास कनेक्शन, 27 वर्ष जुनी हाय प्रोफाईल केस, जाणून व्हाल हैराण
फाईल फोटो
| Updated on: Jul 26, 2025 | 8:52 AM
Share

Jagdeep Dhankhar – Salman Khan: भारताचे माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनखड यांनी आरोग्यविषयक कारणांमुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनखड यांनी राजस्थानमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते प्रथम जनता दलाचे खासदार झाले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यानंतर त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षातही घालवला. जयदीप धनगड हे पूर्व वकील देखील होते.

सलमान खान याचे वकील होते जयदीप धनखड?

राजनीतीमध्ये येण्यापूर्वी जयदीप धनखड हे प्रख्यात वकील होते. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक मोठे खटले लढले. त्यांना स्टील, कोळसा आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रात सखोल कायदेशीर अनुभव आहे. सलमान खानच्या प्रसिद्ध काळवीट शिकार प्रकरणात धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे.

2018 मध्ये, जेव्हा जोधपूर न्यायालयाने सलमानला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तेव्हा त्याला जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आलं. 7 एप्रिल 2018 मध्ये सलमान खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. तेव्हा जयदीप धनखड यांनी सलमान खान याची बाजू मांडली. ‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान घटना घडली होती.

धनखड यांनी न्यायालयाला सांगितलं, सलमान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे आणि त्याच्या तुरुंगवासाचा चित्रपट उद्योगावर परिणाम होईल. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला आणि सलमानला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला.

वकिली ते उपराष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास

जगदीप धनखड यांना 1990 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयातून वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. जाट आरक्षणाच्या लढ्यापासून ते हाय-प्रोफाइल खटल्यांपर्यंत, वकिली ते उपराष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे.

जगदीप धनखड यांचा राजीनामा अचानक आला असेल, पण त्यांचा कायदेशीर आणि राजकीय प्रवास नेहमीच लक्षात राहील. सलमान खानसारख्या मोठ्या खटल्यापासून ते उपराष्ट्रपती होण्यापर्यंत, त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे बजावली आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.