काही गोष्टी झाकून ठेवलेल्याच बऱ्या…, करिश्मा कपूरच्या लग्नाबद्दल जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
Karisma Kapoor Marriage Life: करिश्माला कधीच नाही मिळालं वैवाहिक आयुष्याचं सुख, जवळच्या व्यक्तीकडून अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, 'काही गोष्टी झाकून ठेवलेल्याच बऱ्या, कारण...', सध्या सर्वत्र करिश्माची चर्चा...

Karisma Kapoor Marriage Life: कपूर कुटुंब हे बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. गेल्या अनेक दशकांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनेक कलाकार देखील कपूर कुटुंबियांनी बॉलिवूडला दिले आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर… करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक संकटांचा सामना केला.
करीयरच्या शिखरावर असताना करिश्मा कपूर हिलं लग्न अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत होणार होतं. पण साखरपुडा मोडल्यानंतर, काही दिवसांत करिश्मा हिचं लग्न उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटाच्या दरम्यान, दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलं. लग्याच्या 14 वर्षांनंतर संजय आणि करिश्मा यांनी अधिकृत घटस्फोटाची घोषणा केली.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करिश्माच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुनील दर्शन यांनी सांगितल्यानुसार, ‘करिश्मा आणि संजय कपूर याची बहीण चांगल्या मैत्रिणी होत्या. दोन्ही कुटुंबियांमध्ये देखील चांगलं नातं होतं. पण संजय आणि करिश्मा यांचं लग्न अनेकांसाठी थक्क करणारी गोष्ट होती. कारण करिश्मा, संजय याची दुसरी पत्नी होती…’
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर करिश्माने मुलांना वडिलांपासून लांब ठेवलं नाही. संजय कपूर याच्या निधनानंतर करिश्मा मुलांसोबत पूर्व पतीच्या अंत्यदर्शनासाठी मुलांना घेऊन पोहोचली होती. दिग्दर्शक सुनील दर्शन म्हणाले, ‘लग्नानंतर करिश्माला साधं आयुष्य जगायचं होतं. तिला घरी राहायला आवडत होतं. ती एक कौटुंबिक मुलगी होती. लोकप्रिय सेलिब्रिटी असली तरी, ती सामान्य आयुष्य जगत होती…’
काही गोष्टी झाकून ठेवलेल्याच बऱ्या…
संजय कपूर याच्या निधनानंतर करिश्मासोबत बोलणं झालं का? यावर होकार देत दिग्दर्शक म्हणाले, ‘आमचं बोलणं झालं आहे. मी संपूर्ण प्रकरण पूर्णपणे माहिती आहे. सुरुवातीपासून सर्वकाही माहिती आहे.’ करिश्माच्या वैवाहिक आयुष्यावर बोलताना दर्शन म्हणाले, ‘काही गोष्टी झाकलेल्या बऱ्या असतात.’ सध्या सर्वत्र करिश्माच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
