भारतात राहतेय तर बंदूकच घ्यावी लागेल..; मुलीच्या जन्मानंतर घाबरली अभिनेत्री
Bollywood Actress: भारतात राहतेय तर बंदूकच घ्यावी लागेल..; मुलीच्या जन्मानंतर असं का म्हणाली अभिनेत्री, भीती व्यक्त सांगितलं मोठं सत्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

‘फुकरे’ सिनेमातील भोली म्हणजे अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने ‘मिर्झापूर’ फेम गुड्डू भैय्या म्हणजे अभिनेता अली फजल याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर दोघांनी एका गोंडस मुलीचं जगात स्वागत केलं. ऋचा आणि अली यांची मुलगी आणि 1 वर्षांची झाली आली. पण पत्नी ते आई… हा प्रवास अभिनेत्रीसाठी सोपा नव्हता. आई झाल्यानंतर अभिनेत्रीला सतत भीती सतावत होती. जेव्हा अभिनेत्रीला कळलं की ती गरोदर आहे, तेव्हा आयुष्य संपलं असं अभिनेत्रीला वाटलं. एवढंच नाही तर, अभिनेत्री मुलाच्या सुरक्षेची देखील चिंता व्यक्त केली. भारतात राहण्यासाठी बंदूक घ्यावी लागले… असं ऋचा म्हणाली.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘प्रेग्नेंसीबद्दल माहिती झालं तेव्हा भीती देखील वाटली होती. सध्याच्या स्थितीबद्दल सांगायचं झालं तर, वातावरण आता बदलत आहे. लोकांना मारलं जात आहे. अनेक गोष्टी आहेत, ज्या वाईट घडत आहेत. अशा परिस्थिती मुल जन्माला घालणं योग्य आहे का?’ असा प्रश्न देखील अभिनेत्रीने उपस्थित केला.
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही पूर्णपणे इंडीपेंडेंट असता तेव्हा, गोष्ट बदलेल्या असतात. कारण तुम्हाला व्यक्तीसाठी जबाबदार व्हावं लागतं. सुरुवातीचे 6 महिने तरी, मुलांसाठी पदार्थ पुरवणं फार कठीण असतं आणि जबाबदारीचं काम असतं… सुरुवातीला भीती वाटली, माझं आयुष्य आता संपलं आहे… असं मला वाटलं…’
मुलीचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘एका मुलीची आई झाल्यापासून मी अधिक सतर्क झाली आहे. मला असं वाटलं आपण भारतात राहतो म्हणून मला बंदूक खरेदी करावी लागेल… त्यानंतर मी विचार केला आपण बघून घेऊ… सध्या आम्ही आमच्यानुसार मुलीला सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत…’ असं देखील ऋचा म्हणाली.
ऋचा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2020 मध्ये अभिनेता अली फजल याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर 2022 मध्ये रिसेप्शन आयोजित केलं आणि 2024 मध्ये मुलीचं जगात स्वागत केलं. 16 जुलै रोजी त्यांची लेक 1 वर्षांची झाली आहे.
