AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara: गुपित समोर आलंच, ‘या’ कारणांमुळे ‘सैयारा’ची बंपर कमाई, जाणून व्हाल थक्क

Saiyaara Box Office: अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टारर 'सैयारा' सिनेमा करतोय बंपर कमाई, 'या' कारणांमुळे 'सैयारा' करतोय बंपर कमाई... अखेर गुपित समोर आलंच

Saiyaara: गुपित समोर आलंच, 'या' कारणांमुळे 'सैयारा'ची बंपर कमाई, जाणून व्हाल थक्क
फाईल फोटो
| Updated on: Jul 25, 2025 | 8:53 AM
Share

Saiyaara Box Office: सैयारा म्हणजे चांदण्यांमध्ये फिरणारा एक अनोखा तारा, जो आपल्या तेजाने इतरांचे जीवन उजळवतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘सैयारा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमाने आतापर्यंत 175.75 कोटींची कमाई केली आहे. सिनेमात दिग्गज आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी नसताना देखील सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. सिनेमाची क्रेझ सध्या तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. तर सिनेमा बंपर कमाई का करत आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. सिनेमाच्या बंपर कमाईचं रहस्य समोर आलं आहे.

का होत आहे ‘सैयारा’ सिनेमाची बंपर कमाई?

सैयारा प्रदर्शित झाल्यापासून, चित्रपटगृहांमधून असे व्हिडिओ येत आहेत, जिथे कोणीतरी आयव्ही ड्रिपवर सिनेमा पाहण्यासाठी आला होता आणि कोणीतरी असह्यपणे रडला होता. सिनेमाच्या लाटेचा इतका प्रभाव पडला की अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली.

पहिल्या दिवशी सिनेमाला 22 कोटींची ओपनिंग मिळाली. विकेंडनंतर सोमवारी सोमवारीच्या कमाईत घट दिसून येते, परंतु सैयाराने सोमवारी देखील 24.25 कोटींची कमाई केली. राजस्थानमध्ये सिनेमाचे वितरण करणारे वितरक राज बसनल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, यशराज फिल्म्सची रणनीती सिनेमाबद्दल अपेक्षा वाढवू नये अशी होती.

नवी स्टारकास्ट आहे म्हणून हळू – हळू व्यापार वाढत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग पाहिल्यानंतर, थिएटर मालकांनी सांगितले की त्यांना सिनेमाचे शो वाढवावे लागले आहेत. सिनेमा सुपरहीट होण्याचं कारण सिनेमातील संगीत आहे. दुसरे कारण म्हणजे दिग्दर्शक मोहित सुरी, जो प्रेमकथा बनवण्यात तज्ज्ञ आहे.

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त असते. पण ‘सैयारा’ सिनेमाच्या टीमने कोणतीच मुलाखत दिली नाही. सोशल मीडियावर देखील सिनेमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. व्हायरल होत असलेल्या रील मध्ये 18 जुलै रोजी काय करत आहात, सैयारा बघायला चला? असं लिहिलं होतं. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श म्हणतात की,  सातव्या-आठव्या दशकात सिनेमांचे पोस्टर्स लागायचे आणि रेडिओवर गाणी वाजायची…

सांगायचं झालं तर, सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी महानायक अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांसरखे अभिनेते देखील मुलाखत देत नव्हते. शिवाय गेल्या काही वर्षांपासून फक्त विनोदी, रंजक आणि ॲक्शनवर आधारित सिनेमे चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान, ‘सैयारा’ सिनेमा प्रेमकथेवर असल्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरला आहे.

सैयाराची तुलना आशिकी 2, रॉकस्टार सारख्या सिनेमांशी केली जात आहे. इथेही अभिनेता संगीताशी जोडलेला आहे, रागावलेला आहे, पण सैयाराचा शेवट आनंददायी आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.