बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंहने खरेदी केली अल्ट्रा लक्झरी BMW कार, 31 इंचाचा टीव्ही, मसाज सिट्स आणि बरेच काही, किंमत किती ?

या कारमध्ये रिअर सिटवर बसणाऱ्या प्रवाशांना अगदी महाराजा सारखे कम्फर्ट मिळतो. तेच ड्रायव्हरसाठी देखील यात अनेक हायटेक स्क्रीन आणि फिचर्स देण्यात आले आहेत.

बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंहने खरेदी केली अल्ट्रा लक्झरी BMW कार, 31 इंचाचा टीव्ही, मसाज सिट्स आणि बरेच काही, किंमत किती ?
Bollywood Actor Ranveer Singh BMW i7 Electric Sedan
| Updated on: Oct 27, 2026 | 7:05 PM

बॉलिवूडच्या अनेक स्टारकडे महागड्या लक्झरी कार आहेत. परंतू अभिनेता रणवीर सिंह यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. परंतू त्याच्याकडील नवीन इलेक्ट्रीक सेडान बीएमडब्ल्यू i7 ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. BMW ची ही फ्लॅगशिप इलेक्ट्रिक कार लक्झरी कार, फिचर्स आणि लूकच्या बाबतीत रोल्स-रॉयस सारख्या सुपर लक्झरी कारना टक्कर देत आहे.  ही कार न केवळ स्टाईलच्या बाबतीत बेजोड आहे. तर याच्यातील सायलेन्ट परफॉर्मन्स आणि रोल्स – रॉयस सारखा कम्फर्ट यास लक्झरी कारच्या जगतातील नवा किंग बनवते. चला तर पाहूयात रणवीर सिंह याच्या या नव्या BMW i7 कारमध्ये असे काय खास आहे जे हिला वेगळे बनवते.

31 इंचाची 8K थिएटर स्क्रीन

BMW i7 ची असली ओळख म्हणजे याच्या केबिनच्या आत पाहायला मिळते. कारच्या मागच्या सिटवर बसताच तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट जेट वा फसर्स्ट-क्लास फ्लाईटमध्ये बसल्या सारखे वाटते. या पाठी बसलेल्या प्रवाशाच्या एंटरटेनमेंटसाठी छताला फोल्ड होणारी 31.3 इंचाची विशाल 8K थिएटर स्क्रीन देण्यात आले आहे.

Loading...

याशिवाय या कारच्या सर्व आसनांना हीटिंग, व्हेंटिलेशन आणि अनेक मोड असणारे मसाज फंक्शन मिळते. पाठच्या सिटला एक बटण दाबताच संपूर्णपणे मसाज चेअर आणि रिलेक्सेशन स्पेसमध्ये बदलता येते. ज्यामुळे पुढची पॅसेंजर सिट आपोआप पुढच्या दिशेने फोल्ड होते. भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू i7 50 xDrive मॉडेलची सुरुवातीची किंमत 1.95 कोटी रुपये आहे.

कमालीचा कंट्रोल

डॅशबोर्डवर ड्रायव्हरसाठी मोठा डिजिटल डिस्प्ले आणि पॅसेंजरसाठी स्वतंत्र टचस्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय हॉरिजॉन्टल स्पोक्सवाले अनोखे स्टीयरिंग व्हील समजण्यास थोडा वेळ लागतो. ड्रायव्हींगच्या बाबतीत ही कार खूप रिफाईंड आणि स्मूथ आहे. या कारचा सर्वात कूल आणि मजेदार फिचर्स याचे ऑटोमेटिक डोअर आहेत. रणवीर सिंह वा त्याच्या चालकाला हे दरवाजे उघडण्यासाठी हाताचा वापर करण्याची गरज नाही. चावीचे बटण किंवा कारच्या आत दिलेल्या सेंसर बटण दाबताच कारचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. जो हिला खूप खास आणि अनोखा लूक देतो.

728 किलोमीटरची रेंज

परफॉर्मन्सचा विचार केला तर BMW i7 50 xDrive मध्ये ट्विन इलेक्ट्रीक मोटर्सचा सेटअप देण्यात आला आहे. जो 483hp ची जबरदस्त पॉवर आणि 660Nm चा टॉर्क जनरेट करते. 5.2 मीटर पेक्षा ही कार जास्त लांब असूनही रस्त्यावर खूप जास्त संतुलित आणि वेगाने पळते. ही कार सिंगल चार्जमध्ये 728 किलोमीटर पर्यंतची एआरएआय रेंज देते. वास्तवात ही कार सह 550 किलोमीटरहून जास्त रेंज देते. यात एअर सस्पेंशन खराब रस्त्यावर झटके शोषून घेतात. त्यामुळे केबिनच्या आत जराही धक्के बसत नाहीत. मात्र खूप लांब व्हील बेस आणि सॉफ्ट सस्पेंशनमुळे ड्रायव्हरला मोठ्या स्पीड ब्रेकरवर ग्राऊंड क्लिअरन्सची थोडी काळजी घ्यावी लागते.

बाहेरुन पाहिल्यावर हीचा नवीन क्रिस्टल DRLs, तेज रेषा मोठ्या आयकॉनिक ग्रिल या कारला रस्त्यावर दमदार रोड प्रेझेन्स देतात. 31 इंचाचा मोठा टीव्ही स्क्रीन, मसाज सिट्स, रिर्घ रेंज आणि शांत राईडमुळे बीएमडब्ल्यू i7 लक्झरी कारमध्ये नवा बेंचमार्क कायम करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us