AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Graduate MLC Election Result Updates : पुण्यात आकडे फिरले, भाजपाला धडकी भरवणारा ट्विस्ट, पदवीधरमध्ये पवारांच्या उमेदवाराची जोरदार मुसंडी!

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. हर्षदा जाधव या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत.

Pune Graduate MLC Election Result Updates : पुण्यात आकडे फिरले, भाजपाला धडकी भरवणारा ट्विस्ट, पदवीधरमध्ये पवारांच्या उमेदवाराची जोरदार मुसंडी!
pune graduate mlc election result updates todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 6:52 PM
Share

Pune Graduate MLC Election Result Today : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण पाच जागांसाठी निवडणूक झाली. आता या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. पुढच्या काही तासात निकाल स्पष्ट होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच ही मतमोजणी केली जातेय. दरम्यान, या निवडणुकीत पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या दोन्ही जागा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या दोन्ही जागांवर आमचाच विजय होईल, अशा विश्वास महायुतीच्या घटकपक्षांकडून व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आम्हीच बाजी मारू, असं ठामपणे सांगितलंय. दरम्यान, आता महायुतीला टेन्शनमध्ये टाकणारा ट्विस्ट आलाय. मतमोजणीदरम्यान महायुतीचा उमेदवार पिछाडीवर आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. हर्षदा जाधव या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. याच जागेसाठी भाजपाने स्मीता जाधव यांना उमेदवारी दिली होती. त्या सध्या पिछाडीवर आहेत. या जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुनील मोदी यांना उमेदवारी दिली होती. तेही पिछाडीवर आहेत. हा मतदारसंघ पदवीधरांचा असल्याने मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आगामी मतमोजणीच्या फेरीमध्ये आकडे फिरू शकतात. परंतु सध्यातरी महायुतीचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मुसंडी मारलीय. त्यामुळे भविष्यात पुढे काय काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात नेमकी काय स्थिती?

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर याच जागेसाठी काँग्रेसकडून जयंत आसगावकर मैदानात आहेत. महायुतीतील बंडखोर तसेच अपक्ष उमेदवार सचिन सानप हेदेखील मैदानात आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बळ पुरवलेले आहे. सध्यातरी कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. त्यामुळे या जागेसाठीदेखील नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात