AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Purnekar Case: पूर्णेकर प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? राजन विचारे, केदार दिघे पोलीस ठाण्यात; तपास अधिकाऱ्यांना जाब विचारला

Pradeep Purnekar Case News: पूर्णेकर कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे. बाहेर रास्ता रोको केल्याचे पाहायला मिळाले आहे. राजन विचारे-केदार दिघे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

Pradeep Purnekar Case: पूर्णेकर प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? राजन विचारे, केदार दिघे पोलीस ठाण्यात; तपास अधिकाऱ्यांना जाब विचारला
| Updated on: Oct 27, 2026 | 6:32 PM
Share

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील वातावरण पुन्हा तापलं आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्याचे पाहायला मिळाले आहे. पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको आंदोलनही सुरूच आहे. या प्रकरणातील तपासाला गती मिळावी आणि आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती मिळावी, यासाठी पूर्णेकर कुटुंबीयांसह माजी खासदार राजन विचारे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक अर्थात SIT चे तपास अधिकारी शैलेश साळवी यांना नौपाडा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात नेमका काय तपास झाला, कोणते पुरावे गोळा करण्यात आले आणि पुढील तपासाची दिशा काय आहे, याबाबत पूर्णेकर कुटुंबीय तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत.

पूर्णेकर कुटुंबीयांनी तपास यंत्रणेला दिलेल्या पुराव्यांची काय तपासणी करण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. याशिवाय राजेंद्र शिंदे यांची काय चौकशी करण्यात आली, तपासात आतापर्यंत कोणते महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि प्रकरणातील संशयितांबाबत काय कारवाई झाली, यासह अनेक मुद्द्यांवर कुटुंबीय तपास अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

या वेळी राजन विचारे आणि केदार दिघे हेही उपस्थित राहून तपासाबाबतची माहिती घेणार आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, तपास अधिकाऱ्यांकडून नेमकी कोणती माहिती देण्यात आली आणि त्यानंतर तपासात काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागलं आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ठाण्यात धडक देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या वेळी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेण्यासोबतच पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली जाणार आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील खरे मारेकरी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास, कुटुंबीयांचे प्रश्न आणि आगामी आंदोलन यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपास यंत्रणा कोणती माहिती देते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात