AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : ‘इट्स डन ब्रो!’ सलमान खानचा रुबाब कमी पडला? रोहित शेट्टीच्या एका ‘वीकेंड का वार’ने जिंकली चाहत्यांची मनं !

सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करतोय. मात्र आता त्याचं होस्टिंग पाहण्यास चाहते फार उत्सुक नसतात. गेल्या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये रोहित शेट्टीचा अंदाज लोकांना जास्त आवडल्याचं दिसून आलं.

Salman Khan : ‘इट्स डन ब्रो!’ सलमान खानचा रुबाब कमी पडला? रोहित शेट्टीच्या एका ‘वीकेंड का वार’ने जिंकली चाहत्यांची मनं !
| Updated on: Oct 27, 2026 | 6:25 PM
Share

वर्ष 2010.. बिग बॉस 4.. मोठ्या पडद्यावरचा चुलबुल पांडे ची दबंगगिरी छोट्या पडद्यावरही दिसली होती. बिग बॉस यादेशातील सर्वात मोठ्या रिॲलिटी शोची होस्ट म्हणून कमान सलामन खानने सांभाळली. अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन यांच्यानंतर सलमान खानकडे ही जबाबदारी आली. त्याने आपल्या होस्टिंगने असा जलवा दाखवा की तोच या शोची आन, बान, शान ठरला. त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की बिग बॉस आणि सलमान खान हे एकमेकांचे पर्याय वाटू लागले. दर सीझनमध्ये अभिनेत्याने त्याचे इमोशन, फीलिंग्स आणि पसर्नॅलिटी बेधडकपणे दाखवसी, सलमानच्या होस्टिंदमध्ये संपूर्ण पॅकेज मिळायचं. त्याच्या दबंगगिरीची अशी जादू दिसू लागली की तो बिग बॉसचा ‘आत्मा’ बनला. त्याच्याविना शोची कल्पनाही करता येऊ शकत नव्हती. मात्र आताही अशीच परिस्थिती आहे का ?

सलमान खानची दबंगगिरी झाली कमी ?

गेल्या 19 वर्षांपासून सलमान खान सातत्याने ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. त्याचा आक्रमक अंदाज, ओरडणं, विनोद करण्याची शैली आणि गंभीर होऊन स्पर्धकांची शाळा घेणं, हे सगळं प्रेक्षकांनी पाहिलं आहे. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान काय बोलणार, कोणाची कानउघाडणी करणार आणि कोण त्याच्या निशाण्यावर असणार, याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असायची. तर सलमानचा राग पाहून स्पर्धकांना घाम फुटायचा. रागाच्या भरात सलमानचं ओरडणं असो किंवा भावुक होऊन रडणं, त्याच्या प्रत्येक कृतीने चाहत्यांच्या मनावर एक छाप उमटली होती.

शोमध्य़े स्टेजवरच्या सलमानने हाताच्या बाह्या वर सरकवल्या की घरातील स्पर्धकांची धडधड वाढायची. स्पर्धकांनी मर्यादा ओलांडल्या की सलमानचा पारा चढायचा आणि त्याचा तो आक्रमक अंदाज पाहून प्रेक्षकही थक्क व्हायचे. सोशल मीडियावरही त्याच्या दमदार सूत्रसंचालनाची जोरदार चर्चा व्हायची.

भाईजानचा अंदाज कुठे गेला ?

मात्र, आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, ‘ भाईजान सलमानचा तो रुबाबदार अंदाज आणि दबंग ऑरा गेला तरी कुठे? ’ एकेकाळी आक्रमक रूपात दिसणाऱ्या सलमानच्या सध्या अतिशय फिक्या प्रतिक्रिया पाहून चाहत्यांची निराशा होत्ये. सलमानच्या होस्टिंगमध्ये आता पूर्वीसारखा आक्रमकपणा आणि तोच जोश दिसत नसल्याची चर्चा आहे. प्रत्येक सीझनसोबत सलमान अधिक शांत होताना दिसत आहे.

पण प्रेक्षकांना सलमानचा हा नवा अंदाज आवडतोय का, हा खरा प्रश्न आहे. आता त्याचं बोलणंही पूर्वीसारखी प्रभावी वाटत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याचा दरारा अजूनही कायम असला, तरी त्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला पूर्वीचा आक्रमकपणा कमी झाल्याचं जाणवतं. सलमानच्या होस्टिंगमधील हा बदल रोहित शेट्टीने शोची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिक ठळकपणे जाणवला.

रोहित शेट्टीचा रुबाबदार अंदाज !

गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान नव्हता, म्हणून त्याच्या बदल्यात रोहित शेट्टीने शोच्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळली आणि प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली. रोहितने स्पर्धकांशी कोणताही आडपडदा न ठेवता संवाद साधला. त्यांची थेटपणे कानउघाडणी केली, त्यांच्यासोबत विनोदही केले आणि स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या स्पर्धकांना अवघ्या काही सेकंदांत त्यांची जागा दाखवून दिली. कानपिचक्याही दिल्या. गेल्या सात आठवड्यांत सलमान जे करू शकला नाही, ते रोहितने आपल्या शैलीत करून दाखवल्याची चर्चा रंगली आहे. एकूणच, रोहित शेट्टीने आपल्या अंदाजाने शोमध्ये रंगत आणली. त्यामुळे आता एकीकडे सलमान खानच्या बदललेल्या सूत्रसंचालनाची चर्चा होत असताना, दुसरीकडे रोहित शेट्टीच्या दमदार अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलंय.

सलमानच्या खुर्चीला बसणार धक्का ?

एवढंच नव्हे तर इंटरनेटवरही रोहित शेट्टीच्या होस्टिंगचं कौतुक झालं. तो सलमान पेक्षा उत्तम असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. त्याच्याच हाता बिग बॉची कमान सोपवा असंही काहींनी सुचवलं. बिग बॉस आता सलमानला नवा पर्याय शोधणार का ? असा नवा प्रश्न रोहित शेट्टीच्या एंट्रीने आता उपस्थित झाला आहे. सलमाननंतर होस्ट म्हणून सर्वांना रोहित शेट्टी परफेक्ट वाटला. कारण त्याच्यात सलमानचा दबंग स्वॅगही आहे आणि रुबाबदार पर्सनॅलिटी सुद्धा. भविष्यात काय होईल हे माहीत नाही. पण आका सलमान शिवायही लोक बिग बॉसची कल्पना करू लागले आहेत हे नक्की. हा नक्कीच दबंग स्टारसाठी एक डेंजर अलर्ट आहे. त्यामुळे त्याच्या खुर्चीला आता धक्का बसणार की सलमानच होस्ट बनून कायम राहणार, हे येत्या काळातच समजेल.

Follow Us
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात