भरदुपारी नागपूर हादरलं, भूकंपाच्या धक्क्याने खळबळ
नागपूरमध्ये आज दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे भूकंपाचे सौम्य धक्के, दुपारी 3.20 मिनिटांच्या सुमारास नागपूरच्या काही भागात पाहायला मिळाले.

उपराजधानी नागपूरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज दुपारी अचानकपणे नागपूर शहरामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यामुळे काही काळ जमीन हादरून गेली होती. यावेळी नागपूरकरांची काहीवेळ भंबेरी उडाली. पण सुदैवाने भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असल्याने कोणतेही संकट शहरावर आलेले नाही.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास नागपूर शहरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागलेय रिश्टर स्केलवर हा भूकंप ३.० इतक्या तीव्रतेचा होता, अशी नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी नागपूरच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशीही माहिती समोर येत आहे की, जमिनीखाली ८ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर या भूकंपाचे केंद्र असू शकते. पण याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
