Salman Khan : तरुणांना लाजवेल असा फिटनेस, सलमान खान याने शेअर केलेल्या या फोटोची तरुणांमध्ये तुफान चर्चा

सलमानचे चाहते त्याचा नवीन नवीन चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशातच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Salman Khan : तरुणांना लाजवेल असा फिटनेस, सलमान खान याने शेअर केलेल्या या फोटोची तरुणांमध्ये तुफान चर्चा
| Updated on: Apr 07, 2023 | 8:19 PM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानचा ‘किसा का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यामुळे आता सलमानचे चाहते त्याच्या हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशातच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा एक फिटनेस फोटो शेअर केला आहे. वर्कआउट केल्यानंतरचा फोटो सलमानने शेअर केला आहे. या फोटोत तरुणांनाही लाजावेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस दिसत आहे. तसंच सलमानची फिटनेसच्या बाबतीत कोणाशीही तुलना करू शकत नाही. हे फोटोतून सिद्ध झालंच आहे.

 

सोशल मीडियावर सलमान खानच्या फिटनेस बाबत नेहमीच चर्चा होत असते. तसंच आताही त्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. त्याचा फिटनेस पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. तसंच त्याच्या या फोटोला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंतीही दर्शवली आहे.

दरम्यान, नुकतीच सलमान खानच्या ताफ्यात एका नवीन कारची एन्ट्री आहे. त्याने बुलेट प्रुफ कार खरेदी केली असून त्याची ही कार खूपच स्टायलिश आहे. पण सलमानने ही कार खरेदी केल्यानंतर असं म्हटलं जातंय की बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यामुळे त्यानं हे मोठं पाऊल उचललं आहे.

सलमानने शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटातील किंग खानसोबतचे त्याचे अॅक्शन सीन्स खूप आवडले होते. ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर सलमान खान ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे जो यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधला चौथा चित्रपट आहे. हा सिनेमा यावर्षी 10 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.