सलमान खानचा शेजाऱ्यावर मानहानीचा दावा, मुंबई दिवाणी न्यायालय म्हणाले, ‘आम्ही नकार देतो!’

बॉलिवुड अभिनेता सलमान खानला (salman khan) मुंबई दिवाणी न्यायालयाने ( Mumbai Civil Court) झटका दिला आहे. सलमान खानने त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे.

सलमान खानचा शेजाऱ्यावर मानहानीचा दावा, मुंबई दिवाणी न्यायालय म्हणाले, आम्ही नकार देतो!
सलमान खान
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 11:22 AM

मुंबई: बॉलिवुड अभिनेता  (bollywood actor ) सलमान खानला (salman khan) मुंबई दिवाणी न्यायालयाने ( Mumbai Civil Court) झटका दिला आहे. सलमान खानने त्याच्या शेजाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे सलमान खानसाठी हा मोठा झटका म्हणावा लागेल.

प्रकरण काय आहे?

अभिनेता सलमान खान सध्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमानचा पनवेलला फार्म हाऊसही आहे. या फार्म हाऊसवर सलमान नेहमी जात असतो. सलमानच्या पनवेलमधल्या फार्म हाऊसच्या शेजारी मालाडमधले कक्कड या गृहस्थांचे देखील फार्म हाऊस आहे. त्यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप सलमानचा आहे.

सलमानची तक्रार काय आहे

सलमानने आपल्या शेजाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. कक्कड या शेजाऱ्यांनी आपली बदनामी केल्याचा सलमानचा आरोप आहे. कक्कड यांनी काही दिवसांपूर्वी युट्यूबवर मुलाखत दिली होती. यावेळी कक्कड यांनी आपल्याबद्दलची खोटी माहिती दिली. त्यामुळे आपल्या प्रतिमेला इजा पोहोचल्याचं सलमानचं म्हणणं आहे.

न्यायायालयात काय झालं?

सलमानने तक्रार केलेलं हे प्रकरण कोर्टात गेलं. आणि यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबईच्या दिवाणी न्यायालयात ही सुनावणी झाली. त्यामुळे सलमानला धक्का बसलाय.

पनवेलच्या या फार्म हाऊसवर सलमान वारंवार जात असतो. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी याच फार्म हाऊसवर तेव्हा त्याला साप चावल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात आले.