Varun Dhawan | राजकुमार हिरानींच्या नव्या चित्रपटात वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका, चित्रपटाचं नाव एकदम हटके !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 15, 2022 | 9:46 AM

पिके, थ्री इडिएट्स असे जगभरात गाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या मेड इन इंडिया या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत सुरुवात होणार आहे.

Varun Dhawan | राजकुमार हिरानींच्या नव्या चित्रपटात वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका, चित्रपटाचं नाव एकदम हटके !
VARUN DHAWAN AND RAJKUMAR HIRANI

मुंबई : पिके, थ्री इडिएट्स असे जगभरात गाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkuma Hirani) यांच्या मेड इन इंडिया या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत सुरुवात होणार आहे. हिरानी यांचा प्रत्येक चित्रपट एखाद्या खास विषयाला घेऊन केलेला असतो. मेड इन इंडिया (Made In India) हा चित्रपटदेखील एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, हा चित्रपट कसदार अभिनय करणारा वरुण धवनकडे आल्यामुळे त्याची आणखी चर्चा होत आहे. यासंबंधीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तासंकेतस्थळावर देण्यात आले आहे.

मेड इन इंडियामध्ये वरुण मुख्य भूमिकेत 

वरुण धवन हिरानी यांच्या मेड इन इंडिया या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र त्याआधी वरुण अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन आणि नितेश तिवारी यांनी केले आहे. वरुण धवनकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. खेत्रपाल यांच्या बायोपिकनंतर वरुण अभिनेत्री कृती सेनॉन हिच्यासोबत भेडिया या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. वरुन धवन ‘जुग- जुग जियो’ या चित्रपटातदेखील अनिल कपूर, कियारा आडवाणी, नितू कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट 2022 मध्ये जून महिन्यात प्रदर्शित केला जाईल.

मेड इन इंडिया चित्रपटात काय असणार ?

मेड इन इंडिया हा चित्रपट एका सत्या घटनेवर आधारित असणार आहे. मात्र या चित्रपटामध्ये कोणत्या विषयाला हाताळण्यात आले आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मागील अनेक वर्षांपासून राजकुमार हिरानी यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारे करण नार्वेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. नार्वेकर यांनी पीके, थ्री इडियट्स अशा महत्त्वाच्या चित्रपटांत हिरानी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे.

शाहरुख खानला मिळणार होता चित्रपट

मेड इन इंडिया या चित्रपटात शाहरुख खान काम करणार होता. मात्र त्याऐवजी आता हा चित्रपट वरुण धवनकडे आला आहे. बॉलिवूड लाईफने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, या चित्रपटाचा विषय काय आहे ? या चित्रपटात काय खास असणार आहे ? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

इतर बातम्या :Happy Birthday | संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्रात असतानाही नील नितिन मुकेशने केली अभिनयाची निवड

‘पारु’ पोरकी झाली, पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, काशीराम चिंचय कालवश

Kapil Sharma Biopic | ग्रेट कॉमेडियन कपिल शर्माच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार, नावही ठरलं !


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI