
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात नेमके काय घडते, यावरही तिच्या चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर त्यांच्या खासगी आयुष्यात आता वादळ आल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक यांनी अजिबातच भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय हिला अभिषेक बच्चन याने प्रपोज केला होता. त्यावेळी दोघे विदेशात एका चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यानंतर 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईत अत्यंत थाटामाटात मोठं लग्न केलं. ते लग्न त्यावेळीचे सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न ठरले.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभाला पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. ऐश्वर्या राय या भाषणात आपल्या आयुष्यात श्री सत्य साई बाबा यांचे किती जास्त महत्व आहे हे सांगताना दिसली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने तिच्या आयुष्यातील अनेक महत्वाची निर्णय श्री सत्य साई बाबा यांना विचारूनच घेतल्याचे सांगितले जाते.
अभिषेक बच्चन याने लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर ऐश्वर्या राय हिने श्री सत्य साई बाबा यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या राय हिने श्री सत्य साई बाबा यांना विचारून आणि त्यांच्यासोबत चर्चा करून अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्री सत्य साई बाबा यांनी अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करणे योग्य असल्याचे सांगितले आणि त्यानंतर तिने अभिषेक बच्चनला याला लग्न करण्यास होकार दिला.
ऐश्वर्या राय हिची श्री सत्य साई बाबा यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. ती श्री सत्य साई बाबा यांच्या कार्यक्रमांना कायमच उपस्थित राहते. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खान याला डेट केले. मात्र, दोघांचे एक अत्यंत वाईट वळणावर ब्रेकअप झाले. त्यानंतर काही दिवसांमध्येच ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.