ऐश्वर्या राय हिचे जाती धर्माबद्दल मोठे विधान, थेट म्हणाली, फक्त एकच जात…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा असून तिच्या चित्रपटांना तूफान प्रेम दिले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून अभिनेत्रीच्य खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या रंगतान दिसत आहेत. आता नुकताच ऐश्वर्या भावूक झाल्याचे बघायला मिळतंय.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामध्ये चर्चेत असते. नुकताच ऐश्वर्या आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभाला पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण करताना ऐश्वर्या भावूक झाली. हेच नाही तर यावेळी तिने जाती-धर्म यावर मोठे भाष्य केले. पहिल्यांदाच ऐश्वर्या नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर दिली. हेच नाही तर आपले भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून त्यांचे आर्शीवाद घेताना ऐश्वर्या दिसली. ऐश्वर्याच्या आयुष्यात श्री सत्य साई बाबा यांचे अत्यंत मोठे महत्व आहे. हेच नाही तर तिने आयुष्यातील अधिक निर्णय सत्य साई बाबा यांनाच विचारून घेतले आहेत. ऐश्वर्या पूर्ण कुटुंब श्री सत्य साई बाबा यांचे भक्त आहे.
सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभामध्ये बोलताना ऐश्वर्या राय हिने म्हटले की, बाबा नेहमी म्हणत की, फक्त एकच जात आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त मानवतेची जात… यासोबच धर्म देखील एकच आहे. तो म्हणजे प्रेमाचा धर्म. हेच नाही तर देवही एकच आहे तो सर्वव्यापी… भाषाही एकच आहे, ती म्हणजे हृदयाची भाषा. यादरम्यानच्या भाषणात ऐश्वर्या राय ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानता दिसली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला पोहोचल्याने कार्यक्रमाची शोभा अधिक वाढल्याचे तिने म्हटले. पंतप्रधानांसोबत कार्यक्रमानंतर ऐश्वर्या संवाद साधताना देखील दिसली. ऐश्वर्या राय अशाप्रकारच्या कार्यक्रमांना फार कमी वेळा उपस्थित असते. सत्य साई बाबा यांच्या शताब्दीला ती उपस्थित होती. ऐश्वर्याने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हीट चित्रपट दिली असून ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे मोठ्या संपत्तीची ती मालकीन आहे.
पहिल्यांचा जात आणि धर्मावर ऐश्वर्या भाष्य केले. तिने एक अत्यंत मोठा संदेश तिच्या भाषणातून यादरम्यान दिला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल मागील काही दिवसांपासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, त्यावर तिने कधीही भाष्य केले नाही. फक्त ऐश्वर्याच नाही तर अभिषेक बच्चन यानेही यादबद्दल बोलण कायमच टाळले आहे.
