
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने काही दिवस डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी अत्यंत वाईट मार्गावर ऐश्वर्या आणि सलमान खान यांचे ब्रेकअप झाले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार रंगताना दिसल्या. मात्र, नक्की काय सुरू आहे हे अभिषेक बच्चन याने स्पष्ट सांगितले. ऐश्वर्या राय लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात कायमच जाताना दिसते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चाहते तणावात आले होते.
नुकताच अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्या राय हिने मोठा खुलासा केला. एका खास पोस्टमध्ये तिने हा खुलासा केला. अभिषेक बच्चन याच्या बर्थडेनिमित्त ऐश्वर्या राय हिने खास पोस्ट शेअर केली. मात्र, वेळी तिने अभिषेक बच्चन याच्या वयाबाबतही थेट खुलासा केला. ऐश्वर्या राय हिने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांना प्रचंड आवडली. बेबी पापा म्हणत ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन 50 वर्षाचा झाल्याचेही यादरम्यान सांगितले.
ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्या वयाबाबत खुलासा केला. आता अभिषेक बच्चन याने वयाच्या 5o वी मध्ये पर्दापण केले. अभिषेक बच्चन याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसला. हेच नाही तर त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, मुलगी आराध्या अजून सोशल मीडियावर नाही.
जर आराध्या हिच्या मित्रांना तिच्याशी काही बोलायचे असेल तर ते तिची आई ऐश्वर्या राय हिच्या मोबाईलवर फोन करतात, आराध्याकडे फोनही नाही. ऐश्वर्या राय कधीच आपल्या लेकीला एकटे सोडत नाही. कोणताही कार्यक्रम असो किंवा काही ऐश्वर्या मुलगीचा हात पकडून असते. आराध्याला आमच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल कल्पना नसेल असेही अभिषेक बच्चन याने म्हटले होते.