
Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या हिचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. पण आता ऐश्वर्या आणि सलमान यांच्या नात्याची नाही तर, अभिनेत्रीच्या एका जुन्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, ऐश्वर्या राय हिचा व्हिडीओ 28 वर्ष जुना आहे. व्हिडीओ 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डोली सजा के रखना’ सिनेमाच्या प्रीमियर दरम्यानचा आहे. सिनेमच्या प्रीमियर दरम्यान, अभिनेता अक्षय खन्ना, ज्योतिका आणि ऐश्वर्या यांनी एकत्र दिसले होते तर, सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं.
‘लेहरेन’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. प्रीमियर दरम्यान सिनेमाच्या कास्ट शिवाय अन्य सेलिब्रिटी देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. साध्या लूकमध्ये ऐश्वर्या हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे…
व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ते सिंपल आणि छान दिवस होते…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसत आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मला सिनेमा प्रचंड आवडतो… सिनेमात सर्वत कलाकारांनी उत्तम काम केलं होतं…’, सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, “डोली सजाके रखना” हा 1997 मल्याळम सिनेमा “अनियाथिप्रावु” चा रिमेक होता. त्याचं शीर्षक “दिलवाले दुल्हनिया” सिनेमातील “मेहंदी लगा के रखना” या हिट गाण्याच्या बोलांवरून घेण्यात आलं होतं. अभिनेत्री ज्योतिका हिने सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं.
ऐश्वर्या हिने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आनंदात खासगी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.